ETV Bharat / state

पाटगाव नांगरणी स्पर्धा :भाजपच्या ७ आयोजकांसह बैल मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखल

मुक्या प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याबद्दल देवरुख पोलिसांनी भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बैल उधळताना
author img

By

Published : Aug 15, 2019, 8:08 AM IST

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथे नांगरणीच्या नावाखाली घेतलेल्या स्पर्धा आयोजकांच्या चांगलीच अंगलट आली आहे. मुक्या प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याबद्दल देवरुख पोलिसांनी भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या स्पर्धेदरम्यान एक बैलजोडी बिथरली आणि सैरभैर पळू लागली. काही जण या बैलजोडीखाली सापडले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोकणात विशेषतः संगमेश्वर तालुक्यात शेत नांगरणी स्पर्धांचे पेव फुटले आहे.

११ ऑगस्ट रोजी भाजपने नांगरणी स्पर्धा स्थानिक मंडळाच्या पुढाकाराने पाटगाव येथील मिलिंद दांडेकर यांच्या शेतात भरवली होती. या स्पर्धेत पाटगाव, पठारवाडी, देवरुख कुंभारवाडी, कनकाडी, निवे बुद्रुक, आरवली, मेघी येथून ५० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धे दरम्यान एक बैलजोडी उधळली होती. ती जोडी बॅरिकेट्स तोडून बाहेर पडली. या प्रकारामुळे स्पर्धास्थळी एकच धावपळ उडाली होती. या बैलजोडीने काहींना चिरडले देखील.
या प्रकरणी देवरुख पोलिसांनी भाजप सुनील धाकटू गोपाळ, बाळा पंदेरे, विजय नटे, दिलीप नटे, बाबू गोपाळ, प्रमोद अधटराव, राजा गवंडी या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या बैल जोडीचे मालक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Intro:पाटगाव येथील नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट

७ आयोजकांसह बैल मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी, प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथे नांगरणीच्या नावाखाली घेतलेल्या स्पर्धा आयोजकांच्या चांगलीच अंगलट आली आहे.. मुक्या प्राण्याना क्रूरपणे वागवल्याबद्दल देवरुख पोलिसांनी भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या स्पर्धेदरम्यान एक बैलजोडी बिथरली आणि सैरभैर पळू लागली. काही जण या बैलजोडी खाली सापडले देखील होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे...कोकणात विशेषतः संगमेश्वर तालुक्यात शेत नांगरणी स्पर्धांचे पेव फुटले आहे... ११ ऑगस्ट रोजी भाजपने अशीच एक स्पर्धा स्थानिक मंडळाच्या पुढाकाराने पाटगाव येथील मिलिंद दांडेकर यांच्या शेतात भरवली होती... या स्पर्धेत पाटगाव, पठारवाडी, देवरुख कुंभारवाडी, कनकाडी, निवे बुद्रूक, आरवली, मेघी येथून ५० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. ..स्पर्धे दरम्यान एक बैल जोडी उधळली आणि ती बॅरिकेटस तोडून बाहेर पडली. या प्रकारामुळे स्पर्धास्थळी एकच कल्लोळ झाला... या बैलजोडिने काहींना चिरडले देखील.. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी सुनील धाकटू गोपाळ, बाळा पंदेरे, विजय नटे, दिलीप नटे, बाबु गोपाळ, प्रमोद अधटराव, राजा गवंडी या भाजपच्या ७ जणांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या बैल जोडिचे मालक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे..Body:पाटगाव येथील नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट

७ आयोजकांसह बैल मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखलConclusion:पाटगाव येथील नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट

७ आयोजकांसह बैल मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.