ETV Bharat / state

'शिवसेनेच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते तयार' - ratnagiri rajesh sawant news

अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद थांबता थांबत नाही. शिवसेनेच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते तयार असल्याचे वक्तव्य भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले.

bjp-workers-ready-to-respond-to-shiv-sena-challenge-said-rajesh-sawant
शिवसेनेच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते तयार - राजेश सावंत
author img

By

Published : Feb 13, 2021, 6:35 PM IST

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद थांबता थांबत नाही. भाजप खासदार निलेश राणेंनी ट्टिटवरून खासदार विनायक राऊत यांना फटके देईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांकडे संयम आहे, तोपर्यत शिवसैनिक शांत रहातील, संयम सुटला तर शिवसेना त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा इशारा माजी खासदार निलेश राणेंना दिला होता. शिवसेनेच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते तयार असल्याचे वक्तव्य भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले.

राजेश सावंत यांची प्रतिक्रिया

भाजपाचे कार्यकर्तेसुद्धा आव्हानाला तयार -

रत्नागिरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात पत्रकार परिषदेत पुन्हा शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांना आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या आव्हानाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा तयार असल्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. ही परिस्थिती जिल्ह्यात होवू नये, विकासावर आव्हान द्यावे, रोजगार आणण्यावर आव्हान द्यावे, मेडिकल काॅलेज राणेंनी सिंधुदूर्गात बांधले तसे काॅलेज बांधून दाखवावे, असा उपरोधीक टोला राजेश सावंत यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मग बाळासाहेबांचा निर्णय चुकीचा होता का? -

शिवसेना खासदार विनायक राऊत हे खासदार नारायण राणे यांच्या शिक्षणासंदर्भात जे बोलले, त्याबाबतही राजेश सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. भाजप खासदार नारायण राणे शिवसेनेच्या काळात मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांचे शिक्षण तेच होते, मग त्यावेळचा शिवसेनेचा निर्णय चुकीचा होता का, असा उलट सवाल राजेश सावंत यांनी विनायक राऊत यांना केला. तर बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले, ते त्यांचे शिक्षण बघून नव्हे, तर त्यांचे संघटनेतील योगदान, त्यांचे कौशल्य, प्रशासनाचा गाढा अभ्यास, नेतृत्व आणि असामान्य कर्तव्य बघून हे विनायक राऊत यांनी लक्षात घ्यावे, असेही राजेश सावंत यांनी म्हटले.

हेही वाचा - नितीन चौगुलेंचे शिवप्रतिष्ठानला आव्हान! समर्थक धारकाऱ्यांचा 21 तारखेला सांगलीत मेळावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.