ETV Bharat / state

उदय सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये, तुमची संस्कृती रत्नागिरीच्या जनतेला ज्ञात - निलेश राणे

author img

By

Published : May 25, 2021, 7:14 PM IST

Updated : May 25, 2021, 8:34 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एकदिवस आधी उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, असा गौफ्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेत अशी कोणतीही भेट झाली नसल्याबाबत खुलासा केला. तर ही पत्रकार परिषद म्हणजे मातोश्रीवर अडचणीत आल्याने, निव्वळ सारवासारव असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

bjp leader nilesh rane on uday samant ratnagiri
निलेश राणे आणि उदय सामंत

रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसमोर सामंत कसे ढोंग करतात, तो खरा चेहरा आज मी समोर आणला आहे. दोन तासातच उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. सामंत कसली संस्कृतीची वार्ता करत आहेत? 2019च्या निवडणुकीत तुमची सगळी संस्कृती काढली होती, हे अख्ख्या रत्नागिरीला माहिती आहे. सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये. अनेक माजी मुख्यमंत्री रत्नागिरीत येतात त्यावेळी सामंत भेटायला जात नाहीत. म्हणून ही राजकीय संस्कृती सामंतांच्या तोंडातून शोभत नाही, असा जोरदार टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केली.

काय म्हणाले निलेश राणे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एकदिवस आधी उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, असा गौफ्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेत अशी कोणतीही भेट झाली नसल्याबाबत खुलासा केला. तर ही पत्रकार परिषद म्हणजे मातोश्रीवर अडचणीत आल्याने, निव्वळ सारवासारव असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नवीन सॉफ्टवेअरमुळे कोरोना चाचणी रिपोर्ट तासाभरात मोबाईलवर

संस्कृतीची भाषा सामंतांनी करू नये -

राणे म्हणाले की, खरे तर सामंत बंधूंचा ढोंगीपणाचा खरा चेहरा जनतेसमोर मी उघडकीस आणला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना त्यांना भेटायचे नव्हतेच पण सामंत वशिल्याने गर्दीतून वाट काढत काढत फडणवीस यांच्यासमोर उभे राहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटावे लागले, असेही निलेश राणे यांनी सांगितले. संस्कृतीची भाषा सामंतांनी करू नये. त्यांच्या तोंडी ती शोभत नाही. मातोश्रीवर या सगळ्या गोष्टी चालत नाही, हे सामंतांना महिती आहे. त्यामुळे आहे ते मंत्रिपद वाचवण्यासाठी उदय सामंताना हा खुलासा करावा लागला, असे निलेश राणे यांनी सांगितले.

सामंतांनी कधीच दखल घेण्यासारखे काम केले नाही -

मी केलेले आरोप हे सामंत यांचा खरा चेहरा दाखवण्यासाठी केले होते. शिवसैनिकांसमोर आणि उद्धव ठाकरेंसमोर सामंत जे ढोंग करतात तो खरा चेहरा मी उघडकीस आणला. या सामंतांनी कधीच दखल घेण्यासारखे काम केले नाही. त्यामुळे ते दखल घेण्यासारखेही नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. सामंतांनी जनसेवा करावी, कामे करावीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, वादळ येऊन गेले आहे. अशा परिस्थितीतही ते फक्त आपला व्यवसाय टिकवण्यासाठी आणि भविष्यात भाजपचे सरकार येणार, हे नक्की असल्यामुळे पुढची पेरणी करायची म्हणजे उद्या अडचणीचे वाटले तर उडी मारायला बरी, हे सामंतांचे जुने धंदे असल्याचे सांगत निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली.

सामंत यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण -

भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. या आरोपाला उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर आले असताना योगायोगाने रत्नागिरी शासकीय विश्रामगृहामध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली, पण ती सर्वांसमोर झालेली भेट होती, असे उदय सामंत म्हणाले. तसेच देवेंद्र फडवणीस आणि माझी भेट झाली याला सहा दिवस उलटून गेले. त्यानंतर अशाप्रकारे ट्विट का करण्यात आले? याबाबत उदय सामंत यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्या मंडळींना कोकणाने नाकारले त्यांनी अशा प्रकारे ट्विट करणे हे राजकीय संस्कृतीत बसत नाही, असा टोला नाव न घेता उदय सामंत यांनी निलेश राणे यांना लगावला आहे.

हेही वाचा - लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याने ग्लोबल टेंडरला काढले, मात्र प्रतिसाद नाही - राजेश टोपे

Last Updated : May 25, 2021, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.