रत्नागिरी - बिहार निवडणुकीच्या निकालानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. बिहार निवडणुकीतील एनडीएचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा करिश्मा असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींना राजकारण जमत नाही हे बिहारवरून पुन्हा एकदा स्पष्ट
याबाबत बोलताना राणे म्हणाले की, बिहार निवडणुकीमध्ये लालूप्रसाद यादव यांचा पक्ष जिंकणार, अशी हवा तयार करण्यात आली होती. पण ती हवा पुन्हा एकदा फुसकी निघाली, राहुल गांधींना राजकारण जमत नाही, हे बिहारच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे मत राणेंनी व्यक्त केले. राजकारणात जी परिपक्वता लागते, उंची लागते, ती या निवडणुकीत राहुल गांधी यांच्यामध्ये दिसली नाही, असा टोला राणेंनी राहुल गांधींना लगावला.
लोकांच्या मनामध्ये बीजेपी आहे, कमळ आहे
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचे जंगलराज चालणार नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जे दिलं त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा भाजपचा विजय दिसते आहे, लोकांच्या मनामध्ये भाजप आहे, कमळ आहे म्हणून निवडणुका कुठल्याही राज्यात असू दे, त्याचा निकाल भाजपच्या बाजूने लागतो. बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सुद्धा चित्र बदलायला वेळ लागणार नाही, कारण महाविकासआघाडी असंतोष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील येणार्या पुढच्या निवडणुकीमध्ये हे चित्र दिसेल, असा आशावाद निलेश राणेंनी व्यक्त केला.
स्वतःचा कचरा कसा करायचा यावर शिवसेनेची पीएचडी
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर माजी खासदार निलेस राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेला नोटा पेक्षाही कमी मतदान झाले आहे. स्वतःचा कचरा कसा करायचा यावर शिवसेनेने पीएचडी केली असल्याचा टोला निलेश राणेंनी लगावला. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेचा देशभरात कचरा झाला, ज्या राज्यात शिवसेना उभी राहते त्या राज्यात शिवसेनेचा पराभव होतो, आता तरी शिवसेनेने यातून धडा घ्यावा आणि महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित करावे, इकडे तिकडे स्वतःचा कचरा करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेची कामे करावीत, असा सल्ला निलेश राणेंनी शिवसेनेला दिला.
'राहुल गांधींना राजकारण जमत नाही; बिहारवरून पुन्हा एकदा स्पष्ट' - राहुल गांधींना राजकारण जमत नाही
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचे जंगलराज चालणार नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जे दिलं त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा भाजपचा विजय दिसते आहे, लोकांच्या मनामध्ये भाजप आहे, कमळ आहे.