ETV Bharat / state

खासदार विनायक राऊत दहावी नापास, कागदपत्रेही वाचू शकत नाहीत; नाणारवरुन निलेश राणेंची खरमरीत टीका

author img

By

Published : Sep 25, 2020, 7:35 PM IST

Updated : Sep 25, 2020, 8:36 PM IST

निलेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार विनायक राऊत यांंनी निलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले की, खासदार विनायक राऊत आज मीडियासमोर येऊन बोलले. मात्र, त्यांनी कसलेही पुरावे सादर केले नाहीत, असा थेट प्रहार निलेश राणे यांनी केला.

निलेश राणे लेटेस्ट न्यूज
निलेश राणे लेटेस्ट न्यूज

रत्नागिरी - खासदार विनायक राऊत यांनी टीकेच्या व्यतिरिक्त पुराव्यांबाबत कोणताच खुलासा केला नसून कागदही वाचू न शकणाऱ्या विनायक राऊतांनी आधी खुलासा करावा, असे आव्हान भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार रिफायनरी संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर पुराव्यासकट पत्रकार परिषदेत सादर केले होते. यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी खासदार राऊत यांना आव्हान दिले आहे.

टीका करण्यापेक्षा विनायक राऊतांनी खुलासा करावा - निलेश राणे

हेही वाचा - राणेंना कवडीची किंमत देत नाही..; रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ

नाणारमध्ये जमीन व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. जागेच्या या घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावसभावाची कंपनी असून या सुगी डेव्हलपर्स कंपनीचे संचालक निशांत देशमुख यांनी १४०० एकर जागा परप्रांतियांना विकली असून जमीन घोटाळ्यात थेट मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला विरोध आणि नंतर रत्नागिरीवासियांना लुटायचे ही शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार विनायक राऊत यांंनी निलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले की, खासदार विनायक राऊत आज मीडियासमोर येऊन बोलले. मात्र, त्यांनी कसलेही पुरावे सादर केले नाहीत, असा थेट प्रहार निलेश राणे यांनी केला.

राणे पुढे म्हणाले की, मी जी काही कागदपत्रे सादर केलीत ते वाचायला लागतील, अभ्यास करायला लागतील. मात्र, विनायक राऊत यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नका, कारण ते दहावी नापास आहेत. दहावी नापास माणूस हे सगळं करू शकेल हे शक्य वाटत नाही. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मी जे काही सादर केलं होतं त्याचा राऊतांनी खुलासा देखील केला नाही. उलट टपोरी माणसं जसे उलटं-सुलट बोलतात, तसे एक टपोरी खासदार विनायक राऊत मीडिया समोर बरगळत होते. एक खासदार कसा असावा याची ट्रेनिंग त्यांना कुणीतरी दिली पाहिजे. मात्र ट्रेनिंग मातोश्री देईल की नाही माहिती नाही, अशी टीका राणे यांनी केली. तसेच, आमच्याकडेही असे विनायक चहा आणण्यासाठी ठेवले आहेत असा उपहासात्मक टोलाही निलेश राणे यांनी हाणला.

हेही वाचा - नाणार जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नातेवाईक, निलेश राणेंचा खळबळजनक आरोप

Last Updated : Sep 25, 2020, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.