रत्नागिरी - भाजप हे एक कुटुंब आहे. कुटुंबात मतभेद असतात पण मनभेद नसतात, असे मत भाजपचे माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - रत्नागिरी: विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; नातेवाईकांचा आरोप
यावेळी चव्हाण म्हणाले, की भाजपमध्ये कोणतेही गट-तट नाहीत. सगळे अॅड. दीपक पटवर्धन यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रचारयंत्रणेत सहभागी झाले आहेत. माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने हे नाराज नसून पटवर्धन यांना निवडून आणण्यासाठी तेही नियोजन करत आहेत. पारदर्शक नेतृत्व, प्रशासनाचा गाढा अनुभव, शहरातील समस्यांची जाण, सामाजिक बांधिलकी, सर्वपक्षीय संबंध यामुळेच पटवर्धन यांना उमेदवारी दिल्याचे चव्हण यांनी सांगितले.
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे देशाच्या सुरक्षेच्या विरोधात, रत्नागिरीत सरकारविरोधी निदर्शने
आमच्यात जे काही विषय होते ते चर्चेने दूर झाले आहेत. मला संघटनेतून बाजूला केले, असा काही विषय नाही. मी काही दिवस परदेशात होतो. पटवर्धन आणि माझे चांगले संबंध आहेत. नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाला मीच अनुमोदन दिले. शहरात भाजपसाठी चांगले वातावरण आहे. ही निवडणूक शिवसेनेच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे लादली गेली आहे, असे बाळासाहेब माने यांनी सांगितले.
हेही वाचा - विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन
रत्नागिरीत शनिवारी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपच्या प्रचार यंत्रणेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रा. नाना शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, अॅड. अविनाश शेट्ये, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजू भाटलेकर, गटनेता समीर तिवरेकर, नगरसेवक राजू तोडणकर, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.