रत्नागिरी - रामदास कदमांनी वापरलेली भाषा अजून कुणी वापरलेली नाही, जी भाषा वापरली ती जस जशी महाराष्ट्रात जाईल, तस तशी रामदास कदम यांची लोक जोड्यांनी पूजा करतील. मुंबईतल्या शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदमांनी ओकलीय अशी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली ( Bhaskar Jadhav Criticize Ramdas Kadam ) आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत ( Bhaskar Jadhav in Chiplun ) होते.
आक्षेपार्ह वक्कव्य - यावेळी भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) म्हणाले की, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्कव्य ( offensive statement about Uddhav Thackeray ) केले. या वक्तव्यामुळे त्यांच्या मुलाच्या राजकीय जिवनाची माती केली आहे. तसेच माझे वडील गेल्यानंतर रामदास कदम मला भेटायला आले, त्यावेळी मी त्यांच्या पाया पडलो. काही वैचारिक पातळी आहे कि नाही. गिते, तटकरे, मुश्रिफ आले या सर्वांच्या पाया पडलो. या रामदास कदम यांना तात्त्काळ वेड्याच्या हाॅस्पीटलमध्ये दाखल करायला हवे. शिंदे सरकारची प्रतिमा रामदास कदम यांच्यामुळे मलिन होतेय, त्यांना तात्काळ या पदावरून हाकला असं आवाहन जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे. तसेच रामदास कदम यांना वेळीच दूर करा, नाहीतर हा माणूस काहीना काहींना अघटीत घडवेल अशीही टीका यावेळी जाधव यांनी केली.
कुठे सभा घ्यावी याला आक्षेप नाही - तसेच लोकशाहीमध्ये कोणी कुठे सभा घ्यावी याला आक्षेप नाही. रामदास कदम असे म्हणाले मी विनय नातूना निवडून आणणार. राज्याचा विरोधी पक्ष नेता पराभूत झाल्याचा इतिहास भास्कर जाधवांनीच केला आहे. दुसऱ्या कोणासाठी भास्कर जाधवांना पराभूत करणे इतके सोपं नाही असं म्हणत जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.