रत्नागिरी - किनारपट्टी भागात पर्ससीन मासेमारीवर आजपासून (बुधवार) बंदी असणार आहे. मात्र, 12 सागरी मैलाच्या बाहेर जावून पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौकांना परवानगी आहे. पण त्याच्या आत जर कोणती नौका मासेमारी करताना आढळली, तर त्या नौकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाने मत्स्य विभागाला दिले आहेत.
हेही वाचा - रत्नागिरीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत
महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981 अंतर्गत पर्ससीन मासेमारीच्या अनुषंगाने शासनाने 05 फेब्रुवारी 2016 रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. या अधिसूचनेची प्रत मच्छिमारी सहकारी संस्थेला देण्यात आलेली आहे. या अधिसूचनेतील महत्त्वाच्या तरतुदीनुसार परवानाधारक पर्ससीन नौकांनी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अधिसूचनेत नमूद केलेल्या क्षेत्रात व विहीत जाळ्यांच्या आकाराचा वापर करुन मासेमारी करता येईल.
हेही वाचा - नववर्षासाठी समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल
अधिसूचनेतील तरतुदीनुसार 01 जानेवारी ते 31 मे पर्यंत पर्ससीन मासेमारीस बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर एलईडी लाईटद्वारे देखील मासेमारी करणाऱ्या नौकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मत्स्य विभागाने दिली आहे.