ETV Bharat / state

कोरोनाचा विपरित परिणाम : रत्नागिरीत पर्यटकांची संख्या रोडावली

कोरोनाचा विपरित परिणाम रत्नागिरीच्या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायावरही झालेला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी दिवाळीत मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येत असतात. परंतु यंदा पर्यटकांची संख्या मंदावली आहे.

author img

By

Published : Nov 13, 2020, 4:39 PM IST

bad impact of coronas on tourism business in ratnagiri
कोरोनाचा रत्नागिरीच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम; पर्यटकांची संख्या मंदावली

रत्नागिरी - कोरोनाचा परिणाम कोकणच्या पर्यटनावरही झालेला आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यावर्षी मात्र रोडावली आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायांनाही याचा फटका बसलेला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीत मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येत असतात. त्यामुळे अथांग समुद्राच्या साक्षीने पर्यटक दिवाळीची सुट्टी एन्जॉय करतात. दिवाळीत इथले हॉटेल, लॉज फुल्ल असतात. यावर्षी मात्र वेगळे चित्र आहे. इथल्या व्यवसायिकांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे. कारण सध्या 10 टक्के सुद्धा बुकिंग नसल्याची माहिती स्थानिक व्यवसायिक देत आहेत.

हॉटेल व्यावसायिकाची प्रतिक्रिया
अथांग कोकण
कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळेच कोकण आणि कोकणाचा अथांग समुद्रकिनारा अनेक पर्यटकांचे आकर्षण असते. त्यामुळेच नववर्ष स्वागत असो, मे महिन्याची सुट्टी असो किंवा दिवाळीची सुट्टी असो, पर्टकांची सर्वाधिक पसंती असते ती कोकणच्या किनारपट्टीला. आंजर्ले, केळशी, कर्दे, लाडघर, गुहागर, मुरुड, गणपतीपुळे, रत्नागिरी, तारकर्ली, मालवण अशा सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर लाखो पर्यटकांची गर्दी या सुट्ट्यांमध्ये असते. त्यामुळे कोकणचे किनारे पर्यटकांनी नेहमीच गजबजून गेलेले असायचे.
यंदा मात्र प्रतीक्षा
दिवाळीची सुट्टी कोकणात घालविण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक अगोदर बुकिंग करत असतात. त्यामुळे दरवर्षी हॉटेल्स, लॉज, एमटीडीसी रिसॉर्ट सर्वच 100 टक्के फुल्ल असते. त्यामुळे अनेकांना तर रूमही मिळत नाही. यावर्षी मात्र, कोरोनाचा मोठा परिणाम इथल्या पर्यटनावर झालेला आहे. कोरोनामुळे काही निर्बंध आले आहेत. त्यातच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे यावर्षी उन्हाळी सुट्टीचा हंगामही वाया गेला. त्यानंतर दिवाळीतही हीच स्थिती राहणार, अशी शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीत फुल्ल असणाऱ्या हॉटेल्सचे बुकिंग यावर्षी 10 टक्केही नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
रेटपेक्षा कोरोना खबरदारीची चौकशी
बुकिंग अगदी नगण्य आहे, जे आहे ते कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांचे आहे, पर्यटकांचे नाहीच. तसेच पर्यटक फोनवरून माहिती घेत आहेत. मात्र, हॉटेल्स-लॉजमधील रूम रेटपेक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती खबरदारी घेतली जात आहे, याची चौकशी करत आहेत. आमच्या क्षेत्रातील तज्ञांच्या मतानुसार जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत पर्यटक बाहेर पडतील असे वाटत नाही, असे सुहास ठाकूरदेसाई यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
गणपतीपुळेच्या भक्तनिवासाचेही बुकिंग नाही
याबाबत गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले की, कोरोनामुळे बंद असलेले गणपती देवस्थानचे भक्त निवास 1 नोव्हेंबरपासून सुरू झाले. दरवर्षी दिवाळीत भक्तनिवास अगदी 100 टक्के फुल्ल असतो. पण गेल्या आठवड्यातील शनिवार- रविवारी पाच सुद्धा खोल्या गेलेल्या नाहीत. लक्ष्मीपूजनांतर तरी पर्यटक येतील असा आशावाद डॉ. भिडे यांनी व्यक्त केला.
एमटीडीसीच्या पर्यटक निवासांकडेही पाठ
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये गणपतीपुळे येथील एमटीडीसीचे पर्यटक निवास भरले होते. मॅनेजर कोट्यातील ज्या रूम होत्या, त्या देखील भरल्या होत्या. यावर्षी मात्र कोरोनाच्या फटक्यामुळे एमटीडीसी पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी असल्याचे एमटीडीसीच्या कोकण विभागाचे रिजनल टुरिझम ऑफिसर दीपक माने यांनी सांगितले. त्यामुळे एकूणच यावर्षी कोरोनाचा फटका दिवाळीतल्या कोकणातील पर्यटनाला बसल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.