ETV Bharat / state

भर बाजारपेठेत फोडलं एटीएम, रत्नागिरी शहरातील घटना - atm incident near police station

शहरातील भर बाजारपेठेत असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी फोडण्याचे धाडस केल्याचं समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. शहर पोलीस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला आहे.

रत्नागिरी
ATM broken by thief in ratnagiri
author img

By

Published : Oct 17, 2020, 6:56 AM IST

रत्नागिरी- शहरातील भर बाजारपेठेत असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी फोडण्याचे धाडस केल्याचं समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. शहर पोलीस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला.

धनजी नाका ते मच्छीमार्केट रोडवर आयसीआयसीआय बँकेचे हे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही बाब परिसरातील स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लवकरच ते सापडतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ठसे तज्ज्ञांची टिमही पोलिसांनी बोलावली आहे. त्यामुळे त्या ठशांशी पोलिस रेकॉर्डला असलेल्या काही सराईत गुन्हेगारांशी काही संबंध आहे की अन्य कोणी आहे, याचा पोलिसांना अंदाज येणार आहे. शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तपास करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.