ETV Bharat / state

रत्नागिरीत कला संगीत महोत्सवाला दिमाखात सुरूवात - Bharatanatyam Thiba Rajwada

२६ जानेवारीला महोत्सवाचे समारोप होणार असून सायंकाळी ६.३० वाजता 'स्त्री ताल तरंग-लय राग समर्पण घटम' सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर सुकन्या रामगोपाल घटम वादन करणार आहे.

ratnagiri
संगीत कला
author img

By

Published : Jan 25, 2020, 3:28 PM IST

रत्नागिरी- शहरातील ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात आर्ट सर्कल संस्थेच्या कला संगीत महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी संध्याकाळी सारस्वत बँकेचे रत्नागिरी शाखाधिकारी सतीश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

रोषणाई केलेल्या थिबा राजवाड्याच्या प्रांगणात या महोत्सवाचा पहिला दिवस रंगला तो भरतनाट्यम आणि शास्त्रीय गायनाने. नृत्यांगना डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांनी भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर शास्त्रीय गायन श्रुती सडोलीकर-काटकर यांनी सादर केले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुग्धा वैशंपायन यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संतूरवादक संदीप चॅटर्जी आणि बासरीवादक संतोष संत यांच्यात जुगलबंदी होणार आहे.

२६ जानेवारीला महोत्सवाचे समारोप होणार असून सायंकाळी ६.३० वाजता 'स्त्री ताल तरंग-लय राग समर्पण घटम' सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर सुकन्या रामगोपाल घटम वादन करणार आहे. सुकन्या या भारतातील पहिल्या स्त्री घटमवादक आहेत. वेगवेगळ्या श्रुतीचे ६ ते ७ घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा 'घटतरंग' हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सर्व वादक स्त्री कलाकार आहेत. दरम्यान, या महोत्सवाच्या निमित्ताने थिबा राजवाड्याच्या दालनात कला जत्रेचेही आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा- भराडीदेवीच्या यात्रेकरिता एलटीटी ते सावंतवाडीसाठी विशेष रेल्वे

Intro:
कला संगित महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरीच्या ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात आर्ट सर्कल संस्थेच्या कला संगित महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी संध्याकाळी सारस्वत बँकेचे रत्नागिरी शाखाधिकारी सतीश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. ऱोषणाई केलेल्या थिबा राजवाड्याच्या प्रांगणात या महोत्सवाचा पहिला दिवस रंगला तो भरतनाट्यंम आणि शास्त्रीय गायनाने. नृत्यांगना डॉ . कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांनी भरतनाट्यम् सादर केले . त्यानंतर शास्त्रीय गायन श्रुती सडोलीकर - काटकर यांनी सादर केलं.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुग्धा वैशंपायन यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे . त्यानंतर संतूरवादक संदीप चॅटर्जी आणि बासरीवादक संतोष संत यांच्यात जुगलबंदी होणार आहे.
तर महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी अर्थात दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुरुवातीला विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे *स्त्री ताल तरंग -लय राग समर्पण*! घटम सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटम वादक सुकन्या रामगोपाल यांनी जबरदस्त प्रभुत्व प्राप्त केलं आहे. भारतातील त्या पहिल्या स्त्री घटमवादक आहेत. वेगवेगळ्या श्रुतीचे 6 ते 7 घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा *घटतरंग* हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सर्व वादक स्त्री कलाकार आहेत.
दरम्यान या महोत्सवाच्या निमित्ताने थिबा राजवाड्याच्या दालनात कलाजत्रेचेही आयोजन करण्यात आलं आहे.
Body:कला संगित महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात Conclusion:कला संगित महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.