ETV Bharat / state

Support To Refinery Project : रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी धोपेश्वरमध्ये सर्वपक्षीय एल्गार - रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी

रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी ( Support To Refinery Project ) राजापूरमधील धोपेश्वर येथे सर्वपक्षीय एल्गार पहायला मिळाला. धोपेश्वर इथं रिफायनरी प्रकल्पासाठी मेळावा झाला. रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्याच्या बाहेर जाऊ नये तो तालुक्यातच मार्गी लागावा आणि कोकणचा विकास व्हावा, या भावनेने प्रकल्पाच्या समर्थनार्थ ( Support To Refinery Project ) राजापुरातील धोपेश्वर येथे सर्व पक्ष व सर्व संघटनांनी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मोठा जनसमुदाय लोटला होता.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Mar 6, 2022, 9:31 PM IST

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी ( Support To Refinery Project ) राजापूरमधील धोपेश्वर येथे सर्वपक्षीय एल्गार पहायला मिळाला. धोपेश्वर इथं रिफायनरी प्रकल्पासाठी मेळावा झाला. रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्याच्या बाहेर जाऊ नये तो तालुक्यातच मार्गी लागावा आणि कोकणचा विकास व्हावा, या भावनेने प्रकल्पाच्या समर्थनार्थ ( Support To Refinery Project ) राजापुरातील धोपेश्वर येथे सर्व पक्ष व सर्व संघटनांनी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मोठा जनसमुदाय लोटला होता.

रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी धोपेश्वरमध्ये सर्वपक्षीय एल्गार

सकारात्मक मनाचे व घरोघरी आनंद निर्माण करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या या प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी यासाठी राजापूरवासीयांनी कंबर कसली आहे. राजापूर तालुक्यातील विविध ५७ सामाजिक संघटना, १३० ग्रामपंचायती सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत हा रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा यासाठी या समर्थन मेळाव्याचे आयोजन केले होते. रिफायनरी प्रकल्प समन्वय समीती राजापूर-धोपेश्वरचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याला काय सुविधा मिळणार आहेत याची माहीती उपस्थिताना प्रस्ताविकामध्ये दिली. मेळाव्याला उपस्थीत सर्वपक्षीय नेतेमंडळींसह मान्यवरांनी कोकणातील वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थीत करुन प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला.

शिवसेना विभाग प्रमुख व उपविभागप्रमुखांनी समर्थन मेळाव्याला हजेरी लावली होती. शिवसेनेचे साखरी नाट्ये उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, शिवसेना महिला संघटक मनाली करंजवकर, पंचायत समिती सदस्य आणि माजी उप सभापती उन्नती वाघरे, शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत मिराशी, सचिन बावनकर, सुभाष शुंगारे, राजन हळदणकर, प्रकाश दुकळे, असे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचे पदाधिकारी रिफायनरी समर्थनाच्या व्यासपीठावर पहायला मिळाले. रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आर्तविनवणी करत रिफायनरी प्रकल्पाला समर्थन ( Support To Refinery Project ) असल्याचा दुजोरा दिला.

मोठ्या संख्येने उपस्थिती - या मेळाव्याला राजापूर तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागातुन नागरीक रिफायनरीच्या समर्थनार्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते. यामध्ये विधानपरिषद माजी आमदार हुस्नबानु खलिफे, भंडारी महासंघाचे अध्यक्ष निविनचंद्र बांधिवडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, डॉ. छाया जोशी, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष शृती ताम्हणकर, फार्डचे अध्यक्ष केशव भट, ॲड. विलास पाटणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, भाजपा राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, गोवळ सरपंच अभिजीत कांबळे, कॉंग्रेस महिला आघाडी प्रमुख अनामिका जाधव, माजी उपसभापती शिवसेना उन्नती वाघरे, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, जिल्हा परिषदेच्या सदस्या लक्ष्मी शिवलकर, माजी उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस संजय ओगले, ॲड.यशवंत कावतकर, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष दिनानाथ कोळवणकर, मनसेचे पुरुषोत्तम खांबल, मेडिकल असोसिएशनचे मजिद पन्हळेकर, राजा काजवे शिवसेना विभाग संघटक डॉ. सुनिल राणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - Nilesh Rane allegations over Nawab Maliks : नवाब मलिक हेच दाऊदचे फ्रंट मॅन असू शकतात - निलेश राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.