ETV Bharat / state

रत्नागिरीत पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला; भाजप कार्यकर्त्यांचा बंडखोरीचा पवित्रा - केदार साठे

भास्कर जाधव शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. दरम्यान जिल्ह्यात भाजपने दोन जागांवर दावा केला होता. जिल्ह्यात पक्ष टिकवायचा असेल तर जिल्ह्यातील किमान एक तरी जागा भाजपच्या वाट्याला यायला हवी होती.

भाजप कार्यकर्त्यांचा बंडखोरीचा पवित्रा
author img

By

Published : Oct 2, 2019, 4:54 PM IST

रत्नागिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीमध्ये आली आणि त्यामुळे मरगळ आलेल्या भाजपमध्ये जिल्ह्यात नवचैतन्य आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती झाली आणि जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला एकही जागा आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा बंडखोरीचा पवित्रा

हेही वाचा- औसातून मुख्यमंत्र्यांचे पीए तर निलंग्यामध्ये पुन्हा काका-पुतण्यात लढाई

जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेचे 3, तर राष्ट्रवादीचे 2 आमदार होते. पैकी भास्कर जाधव शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. दरम्यान जिल्ह्यात भाजपने दोन जागांवर दावा केला होता. जिल्ह्यात पक्ष टिकवायचा असेल तर जिल्ह्यातील किमान एक तरी जागा भाजपच्या वाट्याला यायला हवी होती. मात्र, युतीच्या जागावाटपात जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेला सुटल्या. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. इच्छुक उमेदवार बंडाच्या तयारीत आहेत. पैकी दापोलीमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. तर गुहागरमध्ये भाजपचे राज्य सरचिटणीस डॉ. विनय नातू हे देखील बंडाच्या पवित्र्यात आहे. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका ठरवणार आहेत. तर चिपळूणमधील इच्छुक उमेदवार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल हे देखील बंडाच्या पवित्र्यात आहेत.

"बंडोबाचे बंड शांत करण्यात येईल, असा विश्वास शिवसेना-भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते हे वरिष्ठांचा निर्णय मानणारे आणि पक्षाचे आदेश मनापासून पाळणारे आहेत. पण ही जी नाराजी आहे ती शांत करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून कोणावरही कारवाईची वेळच येणार नाही," असे भाजप जिल्हाध्यक्ष अ‌ॅड दीपक पटवर्धन यांनी म्हटले आहे.

"भाजपच्या या नाराज पदाधिकाऱ्यांशी आपण स्वतः बोलणार असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू," असे शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या या नाराजांचे बंड शांत झाले नाही, तर शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे बंडोबांना थंड करण्यात शिवसेना-भाजपला यश मिळतं का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपच्या नाराजांनी शिवसेनेविरोधात थोपटले दंड

बंडोबांना शांत करण्यासाठी शिवसेना- भाजपचे प्रयत्न

बंडोबा शांत न झाल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणार

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश यात्रा रत्नागिरीमध्ये आली आणि त्यामुळे मरगळ आलेल्या भाजपमध्ये जिल्ह्यात नवंचैत्यन्न आले. मात्र विधानसभा निवडणुकीत युती झाली आणि जिल्हयात भाजपच्या वाट्याला एकही जागा आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादीचे 2 आमदार होते. पैकी भास्कर जाधव शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. दरम्यान जिल्ह्यात भाजपने दोन जागांवर दावा केला होता. जिल्ह्यात पक्ष टिकवायचा असेल तर जिल्ह्यातील किमान एक तरी जागा भाजपच्या वाट्याला यायला हवी होती. मात्र युतीच्या जागावाटपात जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेला सुटला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. इच्छुक उमेदवार बंडाच्या तयारीत आहेत. पैकी दापोलीमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. तर गुहागरमध्ये भाजपचे राज्य सरचिटणीस डॉ विनय नातू हे देखील बंडाच्या पवित्र्यात असून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका ठरवणार आहेत. तर चिपळूणमधील इच्छुक उमेदवार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल हे देखील बंडाच्या पवित्र्यात आहेत.

Byte - केदार साठे, बंडखोर उमेदवार

बंडोबांचं बंड शांत करण्यात येईल असा विश्वास शिवसेना-भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते हे वरिष्ठांचा निर्णय मानणारे आणि पक्षाचे आदेश मनापासून पाळणारे आहेत. पण ही जी नाराजी आहे ती शांत करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून कोणावरही कारवाईची वेळच येणार नाही असं भाजप जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनी म्हटलं आहे.

Byte - ऍड. दीपक पटवर्धन, भाजप जिल्हाध्यक्ष

तर भाजपच्या या नाराज पदाधिकाऱ्यांशी आपण स्वतः बोलणार असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू असं शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे..

Byte - उदय सामंत, शिवसेना उपनेते

भाजपच्या या नाराजांचं बंड शांत झालं नाही, तर शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे बंडोबांना थंड करण्यात शिवसेना-भाजपला यश मिळतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे..
Body:जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपच्या नाराजांनी शिवसेनेविरोधात थोपटले दंड

बंडोबांना शांत करण्यासाठी शिवसेना- भाजपचे प्रयत्न

बंडोबा शांत न झाल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणारConclusion:जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपच्या नाराजांनी शिवसेनेविरोधात थोपटले दंड

बंडोबांना शांत करण्यासाठी शिवसेना- भाजपचे प्रयत्न

बंडोबा शांत न झाल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.