ETV Bharat / state

Uddhav Thackeray Visit To Barsu: शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत - उद्धव ठाकरेंचा निशाणा

उद्धव ठाकरे आज बारसू आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसूत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सोलगावमध्ये गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिला.

Uddhav Thackeray Visit To Barsu
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे
author img

By

Published : May 6, 2023, 10:28 AM IST

Updated : May 6, 2023, 1:50 PM IST

रत्नागिरी : बारसू आणि सोलगावच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ठाकरे म्हणाले की, चांगले प्रकल्प राज्याबाहेर गेले, वाईट प्रकल्प मात्र आणत आहेत. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या लोकांवर वरवंटा चालवणाऱ्याना लाज वाटत नाहीका असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. नारायण राणेंचा त्यांचे नाव न घेता सुक्ष्म असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, शिंदे-भाजप सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. त्यांचे सरकार पडणार हे जवळ-जवळ निश्चित आहे. शिंदेंची ओळख तीन जिल्ह्यातही नव्हती आता मात्र ते गद्दार म्हणून ३० देशात ओळखले जातात, असा घणाघातही ठाकरेंनी केला. प्रकल्पावरुन सत्ताधारी तो लोकांच्या हिताची गोष्ट आहे, असे सांगत आहेत. तर मग बळ का वापरत आहात, असा सवाल त्यांनी केला. आपण जर चुकलो असतो तर इथे आलोच नसतो असे सांगून ते इकडे यायला का घाबरत आहेत असाही मुद्दा ठाकरेंनी मांडला. प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तरी सरकार पडणार आहे, असे भाकितही ठाकरेंनी केले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे कोकणात हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर ठाकरे यांनी सोलगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी गावकऱ्यांची बाजू समजून घेतली. भूमिपुत्रांच्या परवानगीशिवाय कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका आपली असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. हुकुमशाहीने कोणताही प्रकल्प लोकांच्यावर लादू नका असे सांगून, ठाकरे यांनी राज्यसरकारला इशारा दिला. जर लोकांच्या विरोधात काही काम सुरू झाले तर महाराष्ट्र पेटवू असा सज्जड दमही ठाकरे यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे बारसूत आंदोनस्थळी ग्रामस्थांशीही चर्चा करणार आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या पुरातन कातळ शिल्पांची पाहणीही उद्धव ठाकरे करणार आहेत. लोकांचा विरोध डावलून या ठिकाणी काहीही करु देणार नाही अशी ठाम ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. रिफायनरीला विरोध असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण हा प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नाही अशी भूमिका असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी या परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून माती परिक्षणाचे काम सुरू आहे. त्याला प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी जोरदार विरोध करुन आंदोलन छेडले आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूत दाखल झाले आहेत. मात्र प्रशासनाने उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाडमध्ये सभा घेणार आहेत. दरम्यान राज ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा असल्याने दोन्ही ठाकरे बंधू आज कोकणात आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

ठाकरे गटाकडून सभेची बारसूत तयारी : उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी भेटण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या बारसूतील सभेची जोरदार तयारी करण्यात येत होती. मात्र आता जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सभा घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. पण याचवेळी बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या आंदोलकांच्या भेटीसाठी हेलिकॉप्टरने बारसूत दाखल झाले आहेत.

महाडमध्ये सभेला परवानगी : उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकरावर टीका करताना बारसूच्या आंदोलकांना भेटण्यासाठी आपण जाणार असल्याचे जाहीर केले होते. चाकरमान्यांना बारसूत प्रवेश नाकारल्याने उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने बारसूला पोहोचले आहेत. मात्र त्यांच्या सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यांना महाड येथे सभा घेण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे महाडला सभा घेणार आहेत.

पोलिसांनी घेतले सात जणांना ताब्यात : प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे, त्यांची पत्नी मानसी आणि इतर सात जणांना मनाई आदेश मोडल्याने पोलिसांनी ‌ताब्यात घेतले आहे. बारसू परिसराच्या सड्यावर पुन्हा एकदा आंदोलक गोळा होवू लागले आहेत. त्यातून नव्याने आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रत्नागिरीत तगडा पोलीस बंदोबस्त : माती परिक्षणाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या परिसरामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. ठिकठिकाणी पोलीस कुमक तैनात करून ठेवलेली. बारसू परिसराच्या सड्यावर लोकांनी ठिकठिकाणी गर्दी केलेली आहे. तरी, गत आठवड्यापासून सुरू असलेले माती परिक्षणाचे काम सुरू आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरीत सभा घेत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे बारसू आंदोलकांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू रत्नागिरीत असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा - Dhamma Padayatra : दीक्षाभूमी ते लेह लद्दाख धम्म पदयात्रेला सुरूवात; थायलंडचे 100 भंते सहभागी

हेही वाचा -

Sharad Pawar : शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम; पक्षात सुधाराची आवश्यकता

Baramulla Encounter : बारामुल्ला चकमकीत 1 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरूच

Last Updated : May 6, 2023, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.