रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करण्यावरुन शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावर बोट ठेवून खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला समर्थन करणार्या शिवसैनिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा- 'केंद्राला कोरेगाव-भीमा प्रकरणात काहीतरी झाकायचंय... म्हणूनच तपास 'एनआयए'कडे'
काही दलाल शिवसैनिकांचा बुरखा पाघरुन नाणारला समर्थन करत आहेत. मात्र, नाणारचा विषय संपला आहे. त्याबाबत शिवसेना नेते, पदाधिकारी आग्रही असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भाजप मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहे. यावर टीका करत राऊत म्हणाले की, दिल्लीतील पराभवाची पुनरावृती हवी असेल तर महाराष्ट्रमध्ये मध्यावधीची भाषा बोलावी.