ETV Bharat / state

जिल्हा बँकेच्या पगारदार खातेदारांना विम्याचं कवच ; संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

author img

By

Published : Nov 17, 2020, 1:27 PM IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व पगारदार खातेदारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे पगारदार खातेदारांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.

ratnagiri central bank
जिल्हा बँकेच्या पगारदार खातेदारांना विम्याचं कवच ; संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व पगारदार खातेदारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे पगारदार खातेदारांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पगार जमा होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट विमा पॉलिसी सुरू करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून विचाराधीन होता. अखेर यावर संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी संबंधित माहिती दिली.

पगारदार खातेदारकांसाठी 'ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट विमा पॉलिसी'
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, कृषी विद्यापीठ तसेच विविध कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा बँकेत जमा करण्यात येते. राज्य शासनाच्या निर्णयानुसार काही शासकीय कर्मचाऱ्यांनी पगार खाते राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवले होते. परंतु राज्यातील 15 सक्षम जिल्हा बँकांना शासकीय निधी ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे. त्यामुळे
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी 'ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट विमा पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
30 लाखांपर्यंत विमा संरक्षण

कर्मचाऱ्यांना कमाल 30 लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेंतर्गत विमाधारकाचे साप, श्वापद यांनी चावणे आणि बुडून मृत्यू होणे, यांसह अपघाती निधन झाल्यास 100 टक्के विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच दोन डोळे, दोन हात व दोन पाय कायमस्वरुपी निकामी झाल्यास 100 रक्कम अदा करण्यात येईल. एक हात, एक पाय, एक डोळा कायमस्वरुपी निकामी झाल्यास 50 टक्के विमा संरक्षण दिले जाणार आहे. या विमा पॉलिसीचा संपूर्ण हप्ता बँकेमार्फत अदा केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.