ETV Bharat / state

आमदार राजन साळवी यांच्या घरी झडती घेऊन एसीबीकडून गुन्हा दाखल, काय म्हटले आरोपपत्रात? - ACB raids ratnagiri

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी)ने झडती करण्यास सुरुवात केली आहे. एसीबी साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी तपास करत आहे. राजन साळवी हे आतापर्यंत सहा वेळा अलिबाग कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. आमदार साळवी यांच्याविरोधात अधिक संपत्ती जमविल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

thackeray MLA rajan salvi
शिवसेना आमदार राजन साळवी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 11:20 AM IST

Updated : Jan 18, 2024, 4:04 PM IST

आमदार राजन साळवी यांच्या घरी झडती

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांची वहिनी वैद्यकीय कारणामुळे चौकशीला गैरहजर होती. त्यामुळे साळवी यांचे भाऊ आणि पुतण्याला चौकशीला सामोरे जावं लागू शकतं. त्यावेळी त्यांच्यासोबत खुद्द राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत. याबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले की, "भविष्यात मला कितीही त्रास झाला किंवा अटक झाली तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही."

  • एसीबीनं राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपपत्रात साळवी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाचाही उल्लेख केला आहे. उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती असल्याचं एसीबीनं आरोपपत्रात म्हटलं आहे.
    एसीबीचे आरोपपत्र
    एसीबीचे आरोपपत्र

एसीबीच्या चौकशीमुळे राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या : राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबीच्या तपासामुळे अडचणी वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाने राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना नोटीस बजावून चौकशीत सहभागी होण्यास सांगितलं होतं. तसंच एसीबीने काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी केली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार राजन साळवी यांचा रत्नागिरी शहरातील बंगला आणि त्यांच्या हॉटेलचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन करण्यात आलं.

एसीबीकडून राजन साळवी यांच्या घराचे, हॉटेलचे मूल्यांकन : राजन साळवी यांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी करत आहे. त्यामुळे राजन साळवी हे एसीबीच्या चौकशीसाठी आणि आवश्यक माहितीसाठी आतापर्यंत तीन वेळा अलिबाग एसीपी कार्यालयात हजर झाले आहेत. यानंतर एसीबीकडून राजन साळवी यांच्या रत्नागिरी शहरातील बंगला आणि हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये घर आणि हॉटेलचे क्षेत्रफळ, जमिनीची एकूण किंमत आणि इंटिरिअर डिझायनिंग म्हणजेच डेकोरेशनवर होणारा खर्च याचेही मूल्यमापन करण्यात आले आहे. या सगळ्याबाबत बोलताना राजन साळवी यांनी हे सर्व राजकीय दबावामुळे होत असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा :

  1. मला भाजपा प्रवेशाची ऑफर देणारा मोठा माणूस, नाव सांगणार नाही'; सुशीलकुमार शिंदेंनी वाढवला सस्पेंस
  2. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद; महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात येऊ नये, सिद्धरामय्यांनी ठणकावलं
  3. कायदा सर्वांना समान! पोलिसांनी सत्ताधारी आमदार पुत्राला शिकवला धडा, वाहनावर असलेला दंड केला वसूल

Last Updated : Jan 18, 2024, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.