ETV Bharat / state

मानधन वाढ न दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष; जिल्हा परिषदेसमोर धरणे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रीय मानधनवाढीची पंतप्रधानांनी घोषणी केली. मात्र, राज्यात ही मानधनवाढ अद्यापही न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे.

अंगणवाडी कर्मचारी
author img

By

Published : Jun 4, 2019, 11:51 PM IST

रत्नागिरी - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रीय मानधनवाढीची पंतप्रधानांनी घोषणी केली. मात्र, राज्यात ही मानधनवाढ अद्यापही न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. त्यासाठी सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) यांच्यावतीने धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते.

अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्या मांडताना

सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्राने मानधनवाढीची घोषणा केली होती. बऱ्याच राज्यात हे वाढीव मानधन दिले गेले आहे. पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे मानधनवाढ तातडीने द्यावे. तसेच मानधनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जावी. या दोन प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रभर अंगणवाडी कृती समितीच्यावतीने ३ ते ११ जून या कालावधीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ११ जून रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर सोमवार (ता.३) जून रोजी दापोली, खेड व गुहागर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी सुरू ठेवून २ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्षा संज्योक्ती शिंदे, अंकिता महाडिक, शुभांगी मोरे, सारिका हळदणकर, स्नेहा दळवी यांनी नेतृत्व केले. सुमारे ५०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

आज (मंगळवार) चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारीदेखील जिल्हा परिषदेसमोर दु. २ ते ४ या वेळेत धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ६ जून रोजी रत्नागिरी, लांजा व राजापूर येथील अंगणवाडी कर्मचारी जि.प. समोर दु. २ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन करणार आहेत. संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना शिष्टमंडळ भेट देणार असल्याचे जिल्हाध्यक्षा संजोक्ती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Intro:मानधन न वाढल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

रत्नागिरी/प्रतिनिधी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रीय मानधनवाढीची पंतप्रधानांनी घोषणी केली. पण महाराष्ट्रात ही मानधनवाढ अद्यापही न झाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. त्यासाठी सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी सभा(महाराष्ट्र) यांच्यावतीने धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते. ११ जून रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रीय मानधनवाढीची घोषणा करण्यात आली होती. बऱ्याच राज्यात हे वाढीव मानधन दिले गेले आहे. पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीच होत नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मानधनवाढ तातडीने द्यावी. तसेच मानधनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जावी. या २ प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रभर अंगणवाडी कृती समितीच्यावतीने ३ ते ११ जून या कालावधीत हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेसमोर सोमवार(ता.३) जून रोजी दापोली, खेड व गुहागर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी अंगणवाड्या चालवून जिल्हा परिषदेसमोर २ ते ४ या वेळेत धरणे कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यावेळी जिल्हाध्यक्षा संज्योक्ती शिंदे, अंकिता महाडिक, शुभांगी मोरे, सारिका हळदणकर, स्नेहा दळवी यांनी नेतृत्व केले. सुमारे ५०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मंगळवार दि. ४ जून रोजी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारीदेखील जिल्हा परिषदेसमोर दु. २ ते ४ या वेळेत धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ६ जून रोजी रत्नागिरी, लांजा व राजापूर येथील अंगणवाडी कर्मचारी जि.प. समोर दु. २ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन करणार आहेत. संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जि. प. सीईओंना शिष्टमंडळ भेट देणार असल्याचे जिल्हाध्यक्षा संजोक्ती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Byte--Body:मानधन न वाढल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन
Conclusion:मानधन न वाढल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.