ETV Bharat / state

आंबेनळी बस दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण; अपघातास प्रशांत नाही तर प्रकाश जबाबदार असल्याचा आरोप

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील दापोलीचे अधिकारी, लिपिक व इतर कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी फ़िरायला जात असताना आंबेनळी घाटात त्यांच्या बसला अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेत 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

author img

By

Published : Jul 28, 2019, 8:12 AM IST

आंबेनळी बस दुर्घटना

रत्नागिरी- आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी, लिपिक व इतर कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी फिरायला जात असताना आंबेनळी घाटात त्यांच्या बसला अपघात झाला आणि या भीषण दुर्घटनेत 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. दापोलीकरांसाठी हा काळा दिवस ठरला होता. या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही अनेक प्रश्न निरुत्तर आहेत.

आंबेनळी बस दुर्घटना

या अपघाताच्या घटनेचा पोलीस तपास पूर्ण झाला आहे. मृत चालक प्रशांत भांबीड हाच गाडी चालवत होता आणि निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने गाडी चालवल्याने तोच इतर 29 जणांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. तर प्रशांतवर दाखल झालेला गुन्हा हा खोटा असून प्रशांत ऐवजी प्रकाश सावंत देसाई हाच गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशांतचे वडील प्रवीण भांबीड यांनी केली आहे.

घटना काय ?

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे 31 कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते. यामध्ये क्लार्क, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व इतर काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. मात्र सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबेनळी दरीत ही बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला. तर प्रकाश सावंत देसाई हे एकमेव या दुर्घटनेतून बचावले होते. प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधिक्षक आहेत. देसाई यांनीच कोकण कृषी विद्यापीठामध्ये फोन करून अपघाताचं वृत्त दिलं. त्यानंतर तब्बल 26 तास मदत आणि बचावकार्य चालले.

अपघातातील मृतांची नावं

संदीप भोसले, संजीव झगडे, पंकज कदम, नीलेश तांबे, प्रमोद जाधव, प्रमोद शिगवण, संतोष झगडे, हेमंत सुर्वे, राजेश सावंत, राजाराम गावडे, सचिन गुजर, संदीप सुवरे, सचिन गिम्हवणेकर, राजेश बंडबे, सुनील साटले, रत्नाकर पागडे, दत्तात्रय धायगुडे, सुनील कदम, जयंत चोगले, सुयश बाळ, सचिन झगडे, रोशन तबीब, संतोष जालगावकर, विक्रांत शिंदे, रितेश जाधव, राजू रिसबूड, किशोर चोगले, विनायक सावंत, प्रशांत भांबीड, संदीप झगडे.

पोलीस तपासात काय?

या दुर्घटनेचा तपास रायगडमधील पोलादपूर पोलीस करत आहेत. या दुर्घटनेच्या तपासात चालक प्रशांत प्रवीण भांबीड यांने निष्काळजीपणे व हलगर्जीपणे गाडी चालवून स्वतःसह इतर 29 जणांच्या मृत्यूस व यातून वाचलेल्या प्रकाश सावंत देसाई यांच्या दुखापतीस कारणीभूत असल्याचे तपासात निष्पन्न झालं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच त्याने सदरचा गुन्हा केल्याचा पुरावा होत आहे, मात्र बसचालक प्रशांत भांबीड हा देखील या अपघातात मयत झाला आहे, त्यामुळे सदर गुन्ह्याचे अखेर तपासात गुन्ह्याची तशी 'अँबेटेड' वर्गात अखेर समरी मंजूर होण्यास विनंती आहे, असं पत्र रायगड पोलिसांनी न्यायालयात सादर केलं आहे.

प्रशांतचे वडील व मृतांच्या इतर नातेवाईकांचं काय आहे म्हणणं

प्रशांत हा अतिशय उत्कृष्ट चालक होता. एक चालक म्हणून विद्यापीठामध्ये त्याचं नाव होतं. मात्र पोलिसांनी त्याच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे, हा खोटा आहे. तो आम्हाला अमान्य आहे. प्रकाश सावंत देसाई हाच अपघातावेळी गाडी चालवत होता, असा आरोप प्रशांतचे वडील प्रवीण भांबीड यांनी केला आहे. अशा अपघातातून चालकच वाचू शकतो. त्यामुळे प्रकाश सावंत देसाई याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्रवीण भांबीड यांनी केली आहे. तसेच पोलिसांच्या तपासावरच प्रवीण भांबीड यांनी बोट ठेवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

रायगड पोलिसांनी न्यायालयात तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे. मात्र मृतांच्या नातेवाईकांनी तपास थांबवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच अपघातातून वाचलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच केवळ थातुरमातुर कारणं देत पोलीस ही केस गुंडाळत असल्याचा आरोप मृत किशोर चोगले याचे वडील पी एन चोगले यांनी केला आहे.

अद्याप एकाही नातेवाईकाला नोकरी नाही
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार होती. मात्र वर्ष झालं तरी अद्याप एकाही नातेवाईकाला विद्यापीठात नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:आंबेनळी बस दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

पोलिसांच्या तपासावर मृतांच्या नातेवाईकांचं प्रश्नचिन्ह

प्रकाश सावंत देसाईंची नार्को टेस्ट करण्याची मागणी कायम

मृतांच्या नातेवाईकांना अद्याप नोकरी नाही

रत्नागिरी, प्रतिनिधी

आंबेनळी बस दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी, लिपिक व इतर कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी फ़िरायला जात असताना आंबेनळी घाटात त्यांच्या बसला अपघात झाला आणि या भीषण दुर्घटनेत 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. दापोलीकरांसाठी हा काळा दिवस ठरला होता.. या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते.. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही अनेक प्रश्न निरुत्तर आहेत. पोलीस तपास पूर्ण झाला आहे. मृत चालक प्रशांत भांबीड हाच गाडी चालवत होता आणि निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने गाडी चालवल्याने तोच इतर 29 जणांच्या मृत्यूला कारणीभूत आहे असं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर प्रशांतवर दाखल झालेला गुन्हा हा खोटा असून प्रशांत ऐवजी प्रकाश सावंत देसाई हाच गाडी चालवत होता त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रशांतचे वडील प्रवीण भांबीड यांनी केली आहे...

घटना काय ?
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे 31 कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी महाबळेश्वर येथे विद्यापीठच्या बसने सहलीला निघाले होते. यामध्ये क्लार्क, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व इतर काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. मात्र सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबेनळी दरीत ही बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला. तर प्रकाश सावंत देसाई हे एकमेव या दुर्घटनेतून बचावले होते. प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत. देसाई यांनीच कोकण कृषी विद्यापीठामध्ये फोन करून अपघाताचं वृत्त दिलं. त्यानंतर तब्बल 26 तास मदत व बचावकार्य चाललं..

अपघातातील मृतांची नावं

संदीप भोसले, संजीव झगडे, पंकज कदम, नीलेश तांबे, प्रमोद जाधव, प्रमोद शिगवण, संतोष झगडे, हेमंत सुर्वे, राजेश सावंत, राजाराम गावडे, सचिन गुजर, संदीप सुवरे, सचिन गिम्हवणेकर, राजेश बंडबे, सुनील साटले, रत्नाकर पागडे, दत्तात्रय धायगुडे, सुनील कदम, जयंत चोगले, सुयश बाळ, सचिन झगडे, रोशन तबीब, संतोष जालगावकर, विक्रांत शिंदे, रितेश जाधव, राजू रिसबूड, किशोर चोगले, विनायक सावंत, प्रशांत भांबीड, संदीप झगडे

*पोलीस तपासात काय?

या दुर्घटनेचा तपास रायगडमधील पोलादपूर पोलीस करत आहेत. या दुर्घटनेच्या तपासात चालक प्रशांत प्रवीण भांबीड यांने निष्काळजीपणे व हलगर्जीपणे गाडी चालवून स्वतःसह इतर 29 जणांच्या मृत्यूस व यातून वाचलेल्या प्रकाश सावंतदेसाई यांच्या दुखापतीस कारणीभूत असल्याचे तपासात निष्पन्न झालं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पत्रात म्हटलं आहे.. तसेच त्याने सदरचा गुन्हा केल्याचा पुरावा होत आहे, मात्र बसचालक प्रशांत भांबीड हा देखील या अपघातात मयत झाला आहे, त्यामुळे सदर गुन्ह्याचे अखेर तपासात गुन्ह्याची तशी 'अँँबेटेड' वर्गात अखेर समरी मंजूर होण्यास विनंती आहे, असं पत्र रायगड पोलिसांनी न्यायालयात सादर केलं आहे.

*प्रशांतचे वडिल व मृतांच्या इतर नातेवाईकांचं काय म्हणणं आहे

प्रशांत हा अतिशय उत्कृष्ट चालक होता.. एक चालक म्हणून विद्यापीठामध्ये त्याचं नाव होतं. मात्र पोलिसांनी त्याच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे, हा खोटा आहे. आणि तो आम्हाला अमान्य आहे. प्रकाश सावंत देसाई हाच अपघातावेळी गाडी चालवत होता असा आरोप प्रशांतचे वडील प्रवीण भांबीड यांनी केला आहे. आशा अपघातातून चालकच वाचू शकतो.. त्यामुळे प्रकाश सावंत देसाई याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी प्रवीण भांबीड यांनी केली आहे.. तसेच पोलिसांच्या तपासवरच प्रवीण भांबीड यांनी बोट ठेवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
रायगड पोलिसांनी न्यायालयात तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे. मात्र मृतांच्या नातेवाईकांनी तपास थांबवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच अपघातातून वाचलेल्या प्रकाश सावंतदेसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.. तसेच केवळ थातुरमातुर कारणं देत पोलीस ही केस गुंडाळत असल्याचा आरोप मृत किशोर चोगले याचे वडील पी एन चोगले यांनी केला आहे..

*अद्याप एकाही नातेवाईकाला नोकरी नाही

या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार होती. मात्र वर्ष झालं तरी अद्याप एकाही नातेवाईकाला विद्यापीठात नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे..

Byte - 1) प्रवीण भांबीड, (मृत चालक प्रकाश भांबीडचे वडील)
2) पी एन चोगले, (मृत किशोर चोगले याचे वडील)
3) Body:आंबेनळी बस दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

पोलिसांच्या तपासावर मृतांच्या नातेवाईकांचं प्रश्नचिन्ह

प्रकाश सावंत देसाईंची नार्को टेस्ट करण्याची मागणी कायम

मृतांच्या नातेवाईकांना अद्याप नोकरी नाहीConclusion:आंबेनळी बस दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

पोलिसांच्या तपासावर मृतांच्या नातेवाईकांचं प्रश्नचिन्ह

प्रकाश सावंत देसाईंची नार्को टेस्ट करण्याची मागणी कायम

मृतांच्या नातेवाईकांना अद्याप नोकरी नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.