रत्नागिरी - मुक्या प्राण्यांना देखील भावना असतात. असाच काहीसा अनुभव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील विंध्यवासिनीच्या जंगलात अनुभवायला आला. यावेळी जंगली प्राण्यांमधील आईचे ममत्व या लोकांनी जवळून पाहिले.
वनविभागाच्या ट्रॅप कॅमेराने टिपले मायेचे क्षण
दोन बिबट्याची पिल्ले आपल्या आईपासून वेगळी झाली होती. त्यांच्या या भेटीसाठी वनविभाग आणि प्राणीमित्र यांनी पुढाकार घेत या पिल्लांना त्यांच्या आईपर्यंत पोहोचवत त्यांची यशस्वी पुनर्भेट घडवून दिली. 12 जानेवारीला धामणवणे गावातील एका ओढ्यात बिबट्याची दोन पिल्ले स्थानिकांना आढळली. त्यानंतर वनविभागाने पुढाकार घेत या पिल्लांची मादी बिबट्याशी भेट घडवून आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले आणि सहा दिवसानंतर मादी आणि तिच्या पिल्लांची भेट झाली. मादी बिबट्या आपल्या पिल्लांना घेऊन गेल्यामुळे केवळ माणसांमध्येच नाही तर मुक्या प्राण्यांमध्ये असलेले आईपण यावेळी सर्वांना अनुभवता आले. वनविभागाने लावलेले ट्रॅप कॅमेरे या साऱ्या घटनेचे साक्षीदार ठरले. दरम्यानच्या काळात या दोन्ही पिल्लांची विशेष काळजी ही वनविभागाकडून घेतली गेली.
हेही वाचा - मँगोनेटसाठी यावर्षी ४ हजार ५६६ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी