ETV Bharat / state

रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी - Ratnagiri news

दुचाकीवरून घरी जाणाऱ्या सात जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मेर्वी येथे घडली आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिबट्या
author img

By

Published : Aug 24, 2019, 4:33 AM IST

रत्नागिरी- गणेशगुळे-मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याची दहशत पुन्हा एकदा पहायला मिळाली. कारण दुचाकीवरून घरी जाणाऱ्या सात जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मेर्वी येथे घडली आहे. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याचा धुमाकूळ कायम आहे. बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याच्या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी रात्री रत्नागिरीहून गणेशगुळे येथे घरी निघालेल्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने थेट हल्ला केला. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मेर्वी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या गणेशगुळे सरपंच संदीप शिंदेससह सात जणांवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संदीप शिंदे, निखिल साळवी , निलेश म्हादये, बळीराम कुमार जोशी, विश्वास अनंत सुर्वे यांच्यासह कशेळी येथील दोघांचा समावेश आहे. जखमी झालेल्या सात जणांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

बिबट्याच्या या हल्ल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याकडून होत असलेल्या हल्ल्यांचं प्रमाण वाढले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापही यश आलेले नाही.

Intro:रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी

रत्नागिरी: प्रतिनिधी

रत्नागिरीतल्या गणेशगुळे-मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याची दहशत पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. कारण दुचाकीवरून घरी जाणाऱ्या सात जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मेर्वी येथे घडली आहे.. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याचा धुमाकूळ कायम आहे. यापूर्वी पाच वेळा बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याच्या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी रात्री रत्नागिरीहून गणेशगुळे येथे घरी निघालेल्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने थेट हल्ला केला.. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मेर्वी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या गणेशगुळे सरपंच संदीप शिंदेससह सातजनांवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संदीप शिंदे, निखिल साळवी , निलेश म्हादये, बळीराम कुमार जोशी, विश्वास अनंत सुर्वे यांच्यासह कशेळी येथील दोघांचा समावेश आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. जखमी झालेल्या सात जनांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत..
या परिसरात बिबट्याकडून होत असलेल्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापही यश आलेले नाही.
Body:रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमीConclusion:रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.