रत्नागिरी - जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून रात्री उशिरा आलेल्या अहवालात आणखी 47 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात रत्नागिरीच्या पोलीस अधिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. सध्या त्यांची प्रकृत्ती उत्तम आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आलेल्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान एकाच दिवसात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांचा आकडा आता 661 वर पोहचला आहे.
दरम्यान नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये रत्नागिरीमधील 17 रुग्ण, खेड तालुक्यातील 13 रुग्ण, दापोली तालुक्यातील 12 रुग्ण आणि कामथे आणि संगमेश्वर मधील प्रत्येकी 2 तर मंडणगडमधील एका रुग्णाचा समावेश आहे.