ETV Bharat / state

105 मेट्रिक टन आंब्याची समुद्रमार्गे निर्यात, 4 कंटेनर संयुक्त अरब अमिराती तर 1 कंटेनर आंबा ओमानला रवाना - news about ratnagiri

कोरोना विषाणूच्या फैलावाचा फटका यावर्षी आंब्यालाही बसला आहे. मात्र, पणन महामंडळाच्या प्रयत्नाने आंबा निर्यात शक्य झाली आहे.

4 containers of Ratnagiri Hapus mangoes were exported to UAE and Oman
105 मेट्रिक टन आंब्याची समुद्रमार्गे निर्यात, 4 कंटेनर संयुक्त अरब अमिराती तर 1 कंटेनर आंबा ओमानला रवाना
author img

By

Published : Apr 4, 2020, 10:09 PM IST

रत्नागिरी - हापूस आंबा निर्यातीसंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. पणन महामंडळाच्या प्रयत्नाने आंबा निर्यात शक्य झाली आहे. हापूस आंब्याचे पाच कंन्टेनर मध्य पूर्व देशांमध्ये खासगी निर्यातदारांमार्फत पाठविण्यात आले आहेत.

105 मेट्रिक टन आंब्याची समुद्रमार्गे निर्यात, 4 कंटेनर संयुक्त अरब अमिराती तर 1 कंटेनर आंबा ओमानला रवाना

कोरोना विषाणूच्या फैलावाचा फटका यावर्षी आंब्यालाही बसला आहे. आंबा तयार आहे. मात्र, ग्राहक नाही आणि दरही नाही, वाहतूक व्यवस्थाही नाही, अशी स्थिती सुरुवातीला निर्माण झाली होती. त्यानंतर आंबा वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आणि आंबा वाशी बाजार समितीत जाऊ लागला. शुक्रवारी एकाच दिवशी 22 हजार आंबा पेट्या वाशी मार्केटमध्ये आल्या. त्यातून 105 मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. 4 कंटेनर संयुक्त अरब अमिरातीत तर 1 कंटेनर आंबा ओमानला खासगी निर्यातदारांमार्फत समुद्रमार्गे पाठवण्यात आला असल्याची माहिती पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.

दरवर्षी आंबा हंगामात 10 ते 12 हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होत असते. काही देशांमध्ये एअर कार्गो तर काही देशांमध्ये सी कार्गोमार्फत आंब्याची निर्यात होते. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच युरोपसह अन्य काही देशांमध्ये एअर कार्गोमार्गे आंब्याची निर्यात केली जाते. मध्य पूर्व देशांमध्ये म्हणजेच सौदी अरेबिया, दुबई, ओमान यांसह अन्य काही मध्य पूर्व देशांमध्ये समुद्रामार्गे आंब्याची निर्यात केली जाते.

दरवर्षी साधारणतः मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीलाच आंबा निर्यात सुरू होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक पूर्णतः बंद आहे. त्यामुळे हवाई मार्गे होणारी आंबा निर्यात पूर्णतः ठप्प आहे. मात्र, समुद्रमार्गे निर्यात सुरू झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.