ETV Bharat / state

रत्नागिरीत 24 तासांत 102 नवे रुग्ण, आणखी 5 जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1438 इतकी झाली आहे. आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 49 वर पोहोचली आहे.

Ratnagiri
रत्नागिरी
author img

By

Published : Jul 23, 2020, 7:37 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1438 झाली आहे. दरम्यान, 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 858 झाली आहे.

सध्या एकूण अ‌ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 531 आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालय 6, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 3, कोव्हिड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हिड केअर सेंटर घरडा खेड 21, कोव्हिड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर 3 आणि 10 कोव्हिड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.

नव्याने सापडलेल्या 102 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालय, रत्नागिरी - 24 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 48 रुग्ण, दापोली - 2 रुग्ण, घरडा, खेड - 27 रुग्ण, लांजा- 1 रुग्णाचा समावेश आहे.

आणखी 5 जणांचा मृत्यू -

दरम्यान राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा, तसेच रत्नागिरी येथे 68 वर्षीय अ‌ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर खेड येथे 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचे अनुक्रमे वय 71 व 40 वर्षे अशी आहेत. तसेच चिपळूण येथे 49 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 49 झाली आहे.

अ‌ॅक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन -

जिल्ह्यात सध्या 131 अ‌ॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 21 गावांमध्ये, दापोलीमध्ये 5 गावांमध्ये, खेडमध्ये 24 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 61 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.