ETV Bharat / state

रायगडमध्ये वृद्ध महिलेची निर्घृण हत्या, हल्लेखोराने धारदार शस्त्राने केले मानेवर वार - पती शंकर बामुगडे

रोहा तालुक्यातील किल्ला गावात मंगळवारी मध्यरात्री, अरुणा शंकर बामुगडे (६७) या वृद्ध महिलेची अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली.रुणा बामुगडे आणि त्यांचे पती शंकर बामुगडे रात्रीच्यावेळी घरात झोपलेले असताना अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाताने अरुणा यांच्यावर हल्ला केला.

मृतअरुणा बामुगडे
author img

By

Published : Jun 6, 2019, 12:34 PM IST

Updated : Jun 6, 2019, 2:03 PM IST

रायगड - रोहा तालुक्यातील किल्ला गावात मंगळवारी मध्यरात्री, अरुणा शंकर बामुगडे (६७) या वृद्ध महिलेची अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चौकशी करतांना पोलीस अधिकारी

अरुणा बामुगडे आणि त्यांचे पती शंकर बामुगडे रात्रीच्यावेळी घरात झोपलेले असताना अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाताने अरुणा यांच्यावर हल्ला केला.हल्लेखोराने त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मृत्यूमुखी पडलेल्या अरुणा बामुगडे यांचे पती शंकर बामुगडे रात्री लघुशंकेसाठी उठले असता हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. पत्नीची हत्या झाल्याचे समजताच शंकर बामुगडे यांनी आरडाओरड केली. ही घटना क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरली. वृध्द महिलेच्या हत्येचे वृत्त कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पो. निरीक्षक परदेशी व त्यांच्या चमूने तातडीने घटनास्थळ गाठले.

वृद्ध महिलेच्या खुनाचे गांभीर्य लक्षात घेत अलिबागवरून श्वान पथक बोलवण्यात आले. वृद्धेची हत्या कोणी आणि कशासाठी केली, हे लवकरच तपासातून समोर येईल, अशी माहिती पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी दिली आहे. या घटनेमूळे सपूर्ण जिल्हा हादरला आहे.

हत्येबाबत ग्रामस्थांनमध्ये विविध शंका उपस्थित झाल्या असून खूनी जवळचाच आहे, की बाहेरचा, यावर तपास सुरू करून लवकरात लवकर खुन्याला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Intro:
रोहा तालुक्यातील किल्ला गावात वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

जिल्ह्यात एकच खळबळ

रायगड : रोहा तालुक्यातील किल्ला गावात मंगळवारी मध्यरात्री अरुणा शंकर बामुगडे वय ६७ या वृद्ध महिलेची कोणा अज्ञाताने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

वृद्ध महिला अरुणा बामुगडे व त्यांचे पती शंकर बामुगडे घरात झोपले होते. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाताने वृद्धा अरुणा बामुगडे यांच्या मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्यात अरुणा बामुगडे या गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.Body:वीव्हो

मृत्युमुखी पडलेल्या अरुणा बामुगडे यांचे पती शंकर बामुगडे रात्री लघुशंकेस उठले असता त्यांच्या निदर्शनास हा धक्कादायक प्रकार आला. पत्नीची हत्या झाल्याचे समजताच शंकर बामुगडे यांनी आरडाओरडा केली. ही घटना क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरली. वृध्द महिलेच्या हत्येचे वृत्त कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पो. निरीक्षक परदेशी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली .
Conclusion:वीव्हो

वृद्ध महिलेच्या खुनाचे गांभीर्य लक्षात घेत अलिबागवरुन श्वान पथक किल्ला गावात दाखल झाले. प्राथमिक तपासातुन हा हत्या केल्याचा प्रकार असल्याचे समोर आले.

वृद्धेची हत्या कोणी आणि कशासाठी केली ? हे लवकरच तपासातून समोर येईल अशी माहिती पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी दिली. दरम्यान वृद्ध महिलेच्या निर्दयी खुनाने किल्ला गाव यांसह सबंध जिल्हा हादरला. हत्येबाबत ग्रामस्थांत विविध शंका उपस्थित झाल्या. त्यातून हत्यारा हा जवळचा आहे की बाहेरचा यावरून तपास सुरू करून लवकरच खुन्याला अटक करतील ? अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Jun 6, 2019, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.