पुणे - भिमा कोरेगावची लढाई ( Battle of Bhima Koregaon ) ही पुणे जिल्ह्यामधील भीमा ( Bhima Koregaon ) नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई ( Bhima Koregaon History ) आहे. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी झाली होती. इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ( British East India Company ) तसेच पेशवा सैन्यात युद्ध झाले (bhima koregaon vijay stambh history marathi) होते. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन ( Captain Francis F. Staunton ) करीत होते.
मराठा साम्राज्याचा ऱ्हास - इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते. The हिस्ट्री ऑफ ब्रिटीश इंडिया अ क्रोनॅालॅाजी या पुस्तकात ( History of British India: A Chronology ) जॉन एफ. रिडिक यांनी भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास रेखटला आहे. या पुस्तक 1583 ते 1947 या काळात भारतात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या ब्रिटिश लढायांचा उल्लेख आढळून यतो. 1796 मध्ये, पेशवा बाजीराव दुसरा मराठा राज्याचा शासक बनला. इतिहासकार अनिरुद्ध देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे, त्याच्या कारकीर्दीत (1796-1818), मराठ्यांनी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी दोन युद्धे केली. या युद्धांचा शेवट मराठा साम्राज्याचा ऱ्हास, मध्यपश्चिम भारतातील ब्रिटीश राजवटीने झाला.
500 सैनिक दोन 6-पाउंड तोफा - बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या पहिल्या रेजिमेंटचे कॅप्टन जेम्स ग्रँट डफ (1799-1858) 'ए हिस्ट्री ऑफ द मराठाज' (खंड ३) मध्ये लिहितात. 'या गावाचे वर्णन मी माझ्या आठवणीतून देत आहे. मी सात-आठ वर्षे तिथे गेलेलो नाही. खरं तर, कॅप्टन स्टॉन्टन तिथून निघाले तेव्हापासून मी ते गाव पाहिले नाही. त्यावेळी मी ते युद्धस्थळ काळजीपूर्वक पाहिलं होतं. पण नंतर त्याचा तपशील प्रकाशित करण्याचा माझा हेतू नव्हता. "बटालियनने वर्षाच्या शेवटच्या दिवशी, रात्री आठ वाजता सिरूर सोडले", डफ लिहितात. त्यात सुमारे 500 सैनिक दोन 6-पाउंड तोफा होत्या. मद्रास तोफखान्यातील 24 युरोपियन लोकांचा ताफा एका लेफ्टनंटच्या हाताखाली होता. यासोबतच नुकतेच भरती झालेल्या 300 सैनिकांचे घोडदळ पथकही होते.
25 हजार मराठ्यांना रोखलं - 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज' या पुस्तकात जेम्स ग्रांट डफ यांनी या लढाईचा उल्लेख केला आहे. रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहचल्याची नोंद केली आहे. 500 महार सौनिकांनी तिथे त्यांनी 25 हजार मराठ्यांना रोखलं. ते नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिले. ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटत होतं. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं वाटेतल्या गावावर कब्जा केला त्यांनतर त्याचे रुपांतर लढाईत झाले.
पेशवाईत अन्याय - ‘द ट्राईब्स एंड कास्टस ऑफ द सेन्ट्रल प्राविंसेस ऑफ इंडिया’ (1916) या पुस्तकात आर. व्ही. रसाळ लिहतात की, 'पेशव्यांच्या राजवटीतील महारांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती. म्हणूनच महारांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते. रस्त्यातून चालतांना पावलांचे ठसे मिटावेत म्हणून त्यांच्या कंबराला काटेरी झाडाची फांदी बांधली जायची. ज्यामुळे महाराच्या पायांचे चालण्याचे ठसे मिटत असे. ब्राह्मण दिसल्यावर महारांची सावलीही ब्राह्मणावर पडू नये म्हणून त्यांना त्याच्यापासून काही अंतरावर जमिनीवर तोंड करून झोपावे लागत होते. महार अथवा मांगांची सावली ब्राह्मणावर पडली तर, आंघोळ करून आपली अशुद्धता दूर करेपर्यंत तो अन्न पाणी खात नव्हते'
मराठ्यांच्या बाजूने २८ हजार सैनिक - काही युरोपियन तर काही इतर देखील सौनिक होते. तर, मराठ्यांच्या बाजूने 28 हजार सैनिक होते. ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवे बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब, गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते. महार, मांग तसेच इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे तसेच मराठ्यांविरूद्ध लढले होते. यात 28 हजार सैनिकांचा फक्त ५०० महार सौनिकांनी पराभवर केला होता.
पेशव्यांसह मराठा सौनिकांना पळती भूई थोडी - 1800 च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड,नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते. त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा, नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झाले होते. या युद्धात महार सौनिकांनी पेशव्यांसह मराठा सौनिकांना पळती भूई थोडी केली होती.
शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ 75 फूट विजयस्तंभ - कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला आहे. त्यावर 20 शहीद, 3 जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली आहे. या विजय स्तंभावर ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’ असे लिहिले आहे. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून अनुयायी लाखोंच्या संख्येने येत असतात. या विजयी स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून शहीद सैनिकांना मानवंदना दिली जाते.
पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय - पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात 1 जानेवारी 1818 रोजी लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते, असे काही इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती. तरस इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते असेही संदर्भ दिले जातात. तरीही ‘महार रेजिमेंट’ने आपल्यापेक्षा संख्येने 40 पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केल होता. ‘महार रेजिमेंट’ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवल्याने अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर या समाजातील सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 ला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत ‘महार रेजिमेंट’ने इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही दिली होती भेट - 1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी 1जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.दरवर्षी मोठ्या उत्साहाने अनुयायी या विजस्थंभाला अभिवादनासाठी येत असतात.
2018 साली घडली होती दंगल - अहमदनगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाला. वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली सुरु असतानाच पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने कोरेगाव क्रांतीस्तंभाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी येत होते. त्याचवेळी ताण-तणाव निर्माण झाला. नक्की हा हिंसाचार का झाला त्यामागील कारणे अद्यापही समोर आलेली नाहीत.
वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक - 1 जानेवारी 2018 रोजी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील दोन ते तीन दिवस सणसवाडीत तणावपूर्ण शांतता होती. मात्र, या घटनेचे पडसाद पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले.
कोरोना काळात ही निर्बंध मध्ये शौर्यदीन साजरा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधात सर्व सण उत्सव दोन वर्ष निर्बंधात साजरी करावी लागली. या दोन वर्षात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन साजरा करण्यात आलं. यंदा मोठ्या संख्येने येणार भीम अनुयायी पेरणे फाटा येथे 1 जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने प्रशासनाने योग्य ती तयारी यंदा केली आहे. या सोहळ्यादरम्यान 1 जानेवारी रोजी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महसभा सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात येणार असून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी, मानवंदना कार्यक्रम होणार आहे. सकाळी 8 वा. नंतर अभिवादन स्थळ सर्व अनुयायांना अभिवादनाकरिता खुले असणार आहे.
समन्वयसाठी विविध समित्या - या कार्यक्रमासाठी शासनाने समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समिती गठित केली आहे. या समितीचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख हे अध्यक्ष आहेत. तर समाजकल्याणचे पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी हे समितीचे सदस्य सचिव असून त्यांनी शासनाच्या इतर विभागाच्या समन्वय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी विविध समित्यांचे गठण केले आहे. संनियंत्रण समिती, राजशिष्टाचार समिती, नियत्रंण कक्ष- पुणे, नियत्रंण कक्ष-भिमा कोरेगाव, नियोजन समिती, रंगमंच समिती, पास समिती, बुक स्टॉल समिती आदी समित्याद्वारे नियोजन करण्यात येत आहे.
स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष - अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या महिलाची संख्या विचारात घेता लहान बाळांना स्तनपानासाठी स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर हिरकणी कक्षाचे उद्घाटन डॉ.प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण, इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाज कल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य दूत - विजयस्तंभ ते पार्किंगचे ठिकाण हे अंतर जास्त असल्याने कोणत्याही अनुयायाला काही त्रास झाल्यास किंवा दुखापत झाल्यास तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आरोग्य दूत' ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. येणाऱ्या अनुयायांची गर्दी विचारात घेता दुचाकी वरील आरोग्य दूत तात्काळ आरोग्य सेवा देतील, आरोग्य विभागाची ही संकल्पना नव्याने येथे अंमलात येत आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे.