ETV Bharat / state

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विवेक पाटील यांची बैलगाडी सवारी!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (३ ऑक्टोबर) आणि (४ ऑक्टोबर) हे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांनी आजचा मुहुर्त गाठत अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांनी चक्क बैलगाडीतून जात उमेदवारी अर्ज दाखल केला.

विवेक पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
author img

By

Published : Oct 3, 2019, 3:33 PM IST

रायगड - उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (३ ऑक्टोबर) आणि (४ ऑक्टोबर) हे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांनी आजचा मुहुर्त गाठत अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांनी चक्क बैलगाडीतून जात उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे. कुणी अर्ज भरण्यासाठी हजारोंची गर्दी घेऊन जात आहेत. तर कोणी हटके स्टाईल अवलंबताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि बहुजनांचे राज्य आणण्याच्या स्वप्नातून शेकापची सुरुवात झाली. शेतकरी चळवळ पहिल्यासारखी आणखी मजबूत करण्यासाठी विवेक पाटील हे उरण मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विवेक पाटील यांची बैलगाडी सवारी

हेही वाचा - भाजपचा एकनाथ खडसेंना ठेंगा, मात्र मुलगी रोहिणी खडसेला मिळणार उमेदवारी..?

हेही वाचा - अखेर नितेश राणेंच्या हाती 'कमळ', काँग्रेसचा सोडला हात

मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे विवेक पाटील हे राजकारणापासून दूर होते. २०१४ ची लढत ही अटीतटीची झाली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी विवेक पाटील यांचा अवघ्या ८४६ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणुक ही शेकापच्या अस्तित्वाची लढाई असणार, हे मात्र नक्की.

Intro:पनवेल

सोबत व्हिडीओ जोडला आहे

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता ३ आणि ४ ऑक्टोबर हे दोनच दिवस शिल्लक राहिले असल्याने या दोन्ही दिवशी उमेदवारांनी आजचा मुहुर्त गाठत अर्ज भरण्यासाठी गर्दी केलीये. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांनी तर चक्क बैलगाडीवरून अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. या आगळ्यावेगळ्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पद्धतीमुळे उरणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे.Body:राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण पेटून उठलंय. अर्ज भरण्यास देखील सुरवात झाली आहे. कुणी अर्ज भरण्यासाठी हजारोंची गर्दी घेऊन जात आहेत, तर कुणी हटके स्टाईल अवलंबताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांचे-कामगाऱ्यांचे आणि बहुजनांचे राज्य आणण्याच्या स्वप्नातून शेकाप पक्षाची सुरवात झाली होती. परंतु आता रायगडमधून शेतकरी काळ्या मातीतून उखडला जात आहे. शेतकरी चळवळ पहिल्यासारखी आणखी मजबूत करण्यासाठी विवेक पाटील हे उरण मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.
Conclusion:मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे विवेक पाटील हे राजकारणापासून दूर होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी विवेक पाटील यांचा अवघ्या ८४६ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणुक ही शेकापच्या अस्तित्वाची लढाई असणार, हे मात्र नक्की.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.