ETV Bharat / state

'भाजपचा खरा चेहरा वेगळाच'; विष्णू पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी - भाजप रायगड बातमी

भाजप जिल्हा सरचिटणीस व पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी या नेत्यांनी विविध आश्वासने दिली. परंतु, त्यातील एकही पूर्ण केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

विष्णू पाटील
विष्णू पाटील
author img

By

Published : Jan 31, 2020, 7:50 AM IST

रायगड- रायगड जिल्ह्यात भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस व पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी राजीनामा दिला आहे. वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आपण भाजपला रामराम करत असल्याचे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

विष्णू पाटील

हेही वाचा- ढासळलेल्या रुग्णव्यवस्थेला बळकट करण्याची गरज - शरद पवार

आपण जेएसडब्ल्यू व रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात आंदोलन सुरू केले होते. या बैठकीला तत्कालीन पालकमंत्री, भाजप जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आपल्याला न बोलवता परस्पर बैठक घेतली, असे पाटील म्हणाले. या वरिष्ठ नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला. बैठकीत या नेत्यांनी कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले. तसेच, आपण भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी या नेत्यांनी विविध आश्वासने दिले. परंतु, त्यातील एकही पूर्ण केले नाही. उलट आंदोलन होऊ नये असेच प्रयत्न केले. भाजपचा खरा चेहरा वेगळा आहे, या कारणाने पक्षाला रामराम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांचा राजिनामा

पेण-रायगड

रायगड जिल्हयात भाजपमध्ये सारे काही अलबेल नसल्याचे दिसून येत असून भाजपचे जिल्हा सरचिटणीस व पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी आपण वरिष्ठ नेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे भाजपला रामराम करत असल्याची माहिती पञकार परिषदेत बोलताना दिली.
जिल्ह्यात विष्णू पाटील यांचे आंदोलन सम्राट म्हणून नाव असून विविध आंदोलनातून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. सतत ते जनतेच्या प्रश्नांसाठी कुठे ना कुठे सक्रीय सहभाग घेताना दिसून येतात.Body:रिलायन्स गॅस पाईपलाईन, जेएसडब्ल्यु कंपनी विरोधातील आंदोलन किंवा इतर कोणता विषय असो त्यांचे प्रयत्न सतत सुरु असतात. माञ जेएसडब्ल्यु व रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधातील सुरु केलेल्या आंदोलनाच्या बैठकीला तत्कालीन पालकमंत्री, भाजप जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मला न बोलवता परस्पर बैठक घेतली आणि प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक केली आहे. सदर बैठकीत या नेत्यांनी कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे फार नुकसान झाले आहे.Conclusion:तसेच आपण भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी या नेत्यांनी विविध आश्वासने दिले परंतु त्यातील एकही पुर्ण केले नाही. उलट आंदोलन होऊ नये असेच प्रयत्न केले गेले. भाजपाचा चेहरा फार वेगळा आहे त्यामुळे या फसव्या नेत्यांच्या भूलथापानां कोणीही बळी पडू नका असे सांगून त्यांनी आज पासून भाजपला रामराम करत असल्याचे सांगितले
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.