ETV Bharat / state

रायगडात राष्ट्रवादीचे काटे फिरले; विजयराज खुळेंची घड्याळ सोडून धनुष्याला साथ - vijayraj khule enter again in shivsena

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली पक्षांतराची गळती थांबत नसून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार सुनिल तटकरेंना मोठा धक्का बसला आहे.

विजयराज खुळे
author img

By

Published : Sep 16, 2019, 11:08 AM IST

रायगड - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे हे आज सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या फसव्या आश्वासनानंतर 64 दुष्काळग्रस्त गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे ते पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तसेच ते दक्षिण रायगडातील मोठे राजकीय नेते असून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. काही दिवसांपुर्वीच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे, भाऊ अनिल तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. दरम्यान, विजयराज खुळे यांच्या जाण्याने सुनिल तटकरेंना मोठा धक्का बसला असून येणाऱ्या काळात आणखीन कोणकोण नेते राष्ट्रवादी सोडणार याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

हेही वाचा - ...म्हणून बारामतीतील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली - रोहित पवार

Intro:रायगडात राष्ट्रवादीला गळती सुरुच

विजयराज खुळे आज शिवसेनेत प्रवेश करणार

सुनील तटकरे यांना मोठा धक्का 

रायगड : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे आज शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधनात अडकणार आहेत. अलीकडेच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे, भाऊ अनिल तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.Body:विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. ते दक्षिण रायगडातील बडे राजकीय प्रस्थ असून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.Conclusion:विजयराज खुळे यांच्या जाण्याने सुनील तटकरे यांना मोठा धक्का आहे. त्यामुळे आगामी काळात अजून कोणकोण राष्ट्रवादी सोडणार याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.