रायगड - तौक्ती चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज (गुरुवार) मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार रायगड दौऱ्यावर आहेत. माणगाव, म्हसळा, श्रीवर्षन या तालुक्यातील नुकसान भागाची पाहणी करणार आहेत. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा आज रायगड दौऱ्यावर असून ते पेण, माणगाव, महाड येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
विजय वडेट्टीवार आज रायगडात -
चक्रीवादळाचा फटका हा जिल्ह्यातील अलिबाग, म्हसळा, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांना बसला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे आज रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर साडेचार वाजता श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय भवनात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात पालकमंत्री अदिती तटकरे ही उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाकडून अद्यापही जिल्ह्याला तातडीची कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे दौऱ्यानिमित रायगडात आले असल्याने ते तरी तातडीची मदत जाहीर करणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले ही आज रायगडात -
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. आठवले हे पेण, माणगाव, महाड या तालुक्यातील नुकसान भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर महाड विश्रामगृह येथे साडेचार वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा - अनंतनागच्या कोकेरनागमध्ये आहे आशियातील सर्वात मोठी 'ट्राउट मत्स्य शेती'