रायगड - अलिबाग तालुक्यातील सासवणे गाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कारण बॉलिवूड स्टार वरूण धवन आणि नताशा यांचा विवाह सोहळा सासवणे येथील मेन्शन हाऊस या रिसॉर्टवर संपन्न होत आहे. त्यामुळे मेन्शन हाऊस मध्ये सध्या विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. वरुण आणि नताशा यांचा विवाह हा रविवारी 24 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. विवाहापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमासाठी वरुण धवन आणि त्याचे कुटूंब आज अलिबागमध्ये दाखल होत आहे. अभिनेता मिलिंद सोमण नंतर बॉलिवूड स्टार वरुण धवन यांनीही लग्नासाठी अलिबागला पसंती दिली आहे.
वरुण धवन आणि नताशा यांचा विवाह वरुण आणि नताशा अडकणार विवाहबंधनात-प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते डेव्हिड धवन याचे सुपुत्र बॉलिवूड स्टार वरुण धवन याचा विवाह हा अभिनेत्री नताशा हिच्यासोबत होत आहे. काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होत्या. अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे. वरुण आणि नताशा यांनी आपला विवाह सोहळा करण्यासाठी अलिबागला पसंती दिली आहे.
मेन्शन हाऊसमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू-अलिबाग तालुक्यातील सासवणे हद्दीत मेन्शन हाऊस रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट धवन कुटूंबानी विवाह सोहळ्यासाठी बुक केले आहे. मेन्शन हाऊस रिसॉर्टमध्ये 23 रूम आहेत. प्रशस्त असा लॉन आहे. सध्या या रिसॉर्ट मध्ये वरूण आणि नताशा याच्या विवाहाच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. यासाठी फोटोग्राफर, वेडिंग मॅनेजमेंट कृ, बाऊन्सर आले आहेत. रिसॉर्टमध्ये कोणालाही सोडण्यास परवानगी नसल्याचे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र आतमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे.
करणं जोहर, मनीष मल्होत्रा सह बॉलिवूड उतरणार सासवणेत-वरुण आणि नताशा याच्या विवाह सोहळ्यासाठी 200 निमंत्रित व्यक्तींना आमंत्रित केले आहे. निर्माता व दिग्दर्शक करणं जोहर, मनीष मल्होत्रा यांच्यासह बॉलिवूड स्टार या विवाह सोहळ्यास येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. वरुण धवन याच्यासह त्याचे कुटूंब आज अलिबागमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे 23 आणि 24 दोन दिवस सासवणे येथे बॉलिवूड स्टार यांचा राबता राहणार हे नक्की.
हेही वाचा- अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग म्हणताहेत ‘थँक गॉड’!
हेही वाचा- अनन्या पांडेचा हॉट अंदाज पाहिलात का?