ETV Bharat / state

महाड इमारत दुर्घटना: मंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी दिली भेट - रायगड इमारत दुर्घटना अपडेट

महाड इमारत दुर्घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ सात ते आठ वर्षात इमारत कोसळली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता शिंदे यांनी वर्तवली.

eknath shinde
एकनाथ शिंदेमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी दिली भेट
author img

By

Published : Aug 25, 2020, 9:19 AM IST

रायगड - महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.

मंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी दिली भेट

या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ सात ते आठ वर्षात इमारत कोसळली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता शिंदे यांनी वर्तवली. या इमारतीचा बांधकाम व्यावसायिक आणि ज्या अधिकाऱ्यांनी इमारत बांधकामाला परवानगी दिली, अशा सर्वांवर कारवाई केली जाईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे १९ जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबे राहत होती. इमारतीतील सर्व कुटुंब मुस्लीम धर्मीय होती. एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.