खालापूर(रायगड) - शेलू परिसरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबतची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला
कर्जत-कल्याण या राज्य मार्गावरील शेलू गावाजवळ एक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे या मृतदेहाकडे लक्ष वेधले गेले. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती नेरळ पोलिसांना दिली. नेरळ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी तो मृतदेह साधारणा 40 ते 45 वयोगटातील पुरषाचा असल्याचे दिसून आले. मात्र मृतदेह कुजलेला असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. मृतदेहाच्या अवस्थेवरून 8 ते 10 दिवस त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हत्या की आत्महत्या ? अद्याप स्पष्ट नाही
मृत व्यक्तीचा मृत्य कशामुळे झाला. त्याने आत्महत्या केली की हत्या आहे. याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.तसेच त्या मृतदेहाची ओळखही अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस एस बांगर हे अधिक तपास करत आहेत.