ETV Bharat / state

उमटे धरण ठरतंय धोकादायक, सांडव्‍याच्‍या भिंतीचे दगड निखळले - रायगड

अलिबाग तालुक्यातील 40 गावे, वाड्यांना उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण 1980 साली बांधण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पाणी प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेला आहे. जिल्‍हा परीषदेच्‍या अखत्‍यारीत असलेल्‍या या धरणाची योग्‍यरित्‍या देखभाल दुरूस्‍ती केली जात नाही. त्‍यामुळे या धरणामुळे धोका निर्माण होवू शकतो.

उमटे धरण ठरतंय धोकादायक, सांडव्‍याच्‍या भिंतीचे दगड निखळले
author img

By

Published : Jul 7, 2019, 2:21 AM IST

रायगड - अलिबाग तालुक्‍यातील उमटे येथील धरण धोकादायक बनले आहे. धरणाच्‍या सांडव्‍याच्‍या भिंतीला भगदाड पडले आहे. त्‍याचे दगड निखळून पडल्‍याने ही भिंत कोसळून तिवरेसारखी आपत्‍ती उदभवू शकते, अशी भीती ग्रामस्‍थ व्‍यक्‍त करत आहेत.

उमटे धरण ठरतंय धोकादायक, सांडव्‍याच्‍या भिंतीचे दगड निखळले

अलिबाग तालुक्यातील 40 गावे, वाड्यांना उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण 1980 साली बांधण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पाणी प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेला आहे. जिल्‍हा परीषदेच्‍या अखत्‍यारीत असलेल्‍या या धरणाची योग्‍यरित्‍या देखभाल दुरूस्‍ती केली जात नाही. त्‍यामुळे या धरणामुळे धोका निर्माण होवू शकतो. सांडव्‍याची जी संरक्षक भिंत आहे, या भिंतीचे दगड पडून गेले आहेत. त्‍यामुळे भगदाड पडल्‍यासारखी स्थिती आहे.

धरणाच्‍या सांडव्‍याची दुरूस्‍ती करावी अशी मागणी ग्रामस्‍थांनी अनेकदा केली. याबाबत रायगड जिल्‍हा परिषदेकडे पाठपुरावाही करण्‍यात आला, स्‍थानिक तरूणांनी पत्रव्‍यवहारदेखील केला. परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याचा आरोप ग्रामस्‍थ करत आहेत. तक्रारीनंतर सांडव्‍याच्‍या खालील बाजूस तात्‍पुरती मलमपट्टी करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. रेती आणि सिमेंट वापरून खालील बाजूस दगड लावण्‍यात आले आहेत. मात्र, मुख्‍य सांडव्‍याच्‍या भिंतीला पडलेले भगदाड तसेच आहे. या धरणाच्‍या सांडव्‍याला धोका निर्माण झाला तर त्‍याच्‍या खालील बाजूस असलेल्‍या महान, उमटे, रामराज, बोरघर आदि 10 ते 12 गावांना याचा फटका बसू शकतो असे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

दरम्‍यान दोन दिवसांपूर्वीच जिल्‍हा परीषदेच्‍या अधिकाऱ्यानी या धरणाला भेट देवून पाहणी केली. ‘या धरणाचे पाणी पिण्‍यासाठी वापरले जात असल्‍याने येथे पर्यटकांना येण्‍यास मज्‍जाव आहे ’ अशा आशयाचे फलक या ठिकाणी लावण्‍यात आले आहेत. मात्र, येथील नागरीकांच्‍या मुळ दुखण्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. धरणाच्‍या सांडव्‍याची दुरूस्‍ती व्‍हावी यासाठी आम्‍ही सातत्‍याने जिल्‍हा परीषदेकडे पाठपुरावा केला परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. त्‍यामुळे जिल्‍हा परीषदेचे प्रशासन इथं तिवरे सारखी दुर्घटना होण्‍याची वाट पाहतेय का, असा प्रश्‍न आम्‍हाला पडला आहे. हे प्रकरण जिल्‍हा परीषद प्रशासनाने गांभीर्याने घ्‍यावे अशी आमची कळकळीची विनंती आहे ’ अशा भावना कौस्तुभ पुनकर यानी व्यक्त केल्या

Intro:

उमटे धरण ठरतंय धोकादायक

सांडव्‍याच्‍या भिंतीचे दगड निखळले, तक्रारीकडे जिल्‍हा परीषदेचे दुर्लक्ष

रायगड : अलिबाग तालुक्‍यातील उमटे येथील धरण धोकादायक बनले आहे. धरणाच्‍या सांडव्‍याच्‍या भिंतीला भगदाड पडले आहे. त्‍याचे दगड निखळून पडल्‍याने ही भिंत कोसळून तिवरेसारखी आपत्‍ती उदभवू शकते अशी भीती ग्रामस्‍थ व्‍यक्‍त करीत आहेत.

अलिबाग तालुक्यातील 40 गावे, वाड्यांना उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण 1980 साली बांधण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पाणी प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेला आहे. जिल्‍हा परीषदेच्‍या अखत्‍यारीत असलेल्‍या या धरणाची योग्‍यरित्‍या देखभाल दुरूस्‍ती केली जात नाही. त्‍यामुळे या धरणामुळे धोका निर्माण होवू शकतो. सांडव्‍याची जी संरक्षक भिंत आहे या भिंतीचे दगड पडून गेले आहेत त्‍यामुळे भगदाड पडल्‍यासारखी स्थिती आहे.Body:धरणाच्‍या सांडव्‍याची दुरूस्‍ती करावी अशी मागणी ग्रामस्‍थांनी अनेकदा केली. याबाबत रायगड जिल्‍हा परीषदेकडे पाठपुरावाही करण्‍यात आला, स्‍थानिक तरूणांनी पत्रव्‍यवहारदेखील केला परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याचा आरोप ग्रामस्‍थ करीत आहेत. तक्रारीनंतर सांडव्‍याच्‍या खालील बाजूस तात्‍पुरती मलमपट्टी करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. रेती आणि सिमेंट वापरून खालील बाजूस दगड लावण्‍यात आले आहेत परंतु मुख्‍य सांडव्‍याच्‍या भिंतीला पडलेले भगदाड तसेच आहे. या धरणाच्‍या सांडव्‍याला धोका निर्माण झाला तर त्‍याच्‍या खालील बाजूस असलेल्‍या महान, उमटे, रामराज, बोरघर आदि 10 ते 12 गावांना याचा फटका बसू शकतो असे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

दरम्‍यान दोन दिवसांपूर्वीच जिल्‍हा परीषदेच्‍या अधिकाऱ्यानी या धरणाला भेट देवून पाहणी केली. त्‍यानंतर आज  ‘या धरणाचे पाणी पिण्‍यासाठी वापरले जात असल्‍याने येथे पर्यटकांना येण्‍यास मज्‍जाव आहे ’ अशा आशयाचे फलक या ठिकाणी लावण्‍यात आले आहेत. मात्र येथील नागरीकांच्‍या मुळ दुखण्‍याकडे दुर्लक्ष होत आहे .Conclusion:धरणाच्‍या सांडव्‍याची दुरूस्‍ती व्‍हावी यासाठी आम्‍ही सातत्‍याने जिल्‍हा परीषदेकडे पाठपुरावा केला परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. त्‍यामुळे जिल्‍हा परीषदेचे प्रशासन इथं तिवरे सारखी दुर्घटना होण्‍याची वाट पाहतेय का, असा प्रश्‍न आम्‍हाला पडला आहे. हे प्रकरण जिल्‍हा परीषद प्रशासनाने गांभीर्याने घ्‍यावे अशी आमची कळकळीची विनंती आहे ’

कौस्‍तुभ पुनकर , सदस्य बोरघर ग्रामपंचायत  
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.