ETV Bharat / state

पुराच्या पाण्यातून २ महिन्यांच्या बाळाला वाचवले सुखरुप; पेणमधील अंतोरे गावची घटना

रायगड जिल्ह्यात पेणमध्ये पावसाने उच्चांक गाठल्याने पूर्ण तालुका जलमय झाला आहे. पेणमध्ये रात्री पुराच्या पाण्यात अंतोरे गावातील,दोन महिन्यांच्या बाळासह 30 ते 40 जण अडकले होते. बचाव पथकाने दोन महिन्यांच्या बाळाला व त्याच्या आईला पुराच्या पाण्यातून काढून सुरक्षित स्थळी पोहचवले आहे.

दोन महिन्यांच्या बाळाला सुखरूप स्थळी पोहचवले
author img

By

Published : Aug 4, 2019, 9:14 PM IST

रायगड - जिल्ह्यात पेण तालुक्यात 493 मिमी एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. परिणामी तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पेणमध्ये रात्री पुराच्या पाण्यात अंतोरे गावातील 30 ते 40 जण अडकले होते. यामध्ये एक दोन महिन्यांचे बाळही आपल्या आई-वडिलांसोबत अडकले होते. या कुटुंबासह बाळाला बचाव पथकाने रात्री सुखरुप सुरक्षितस्थळी पोहचवले आहे.

दोन महिन्यांच्या बाळाला सुखरूप स्थळी पोहचवले
जिल्ह्यात पेणमध्ये पावसाने उच्चांक गाठल्याने पूर्ण तालुका जलमय झाला. पेणमधील नद्याही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. रात्रीच्या सुमारास अंतोरे गावात पाणी भरण्यास सुरुवात झाली. पाणी हळूहळू ग्रामस्थांच्या घरात घुसू लागल्याने सर्वजण भयभीत झाले होते. अंतोरेमध्ये पुराचे पाणी घुसल्याची माहिती मिळताच पेण प्रशासनाने कोलाड येथील महेश पवार यांच्या बचाव पथकाला बोलावले. त्यानंतर महेश पवार यांच्या 'कुंडलिका रिव्हर राफ्टिंग टीम'ने बोटीच्या सहाय्याने अंतोरे मधील अडकलेल्या कुटूंबांना हलवण्यास सुरुवात केली. मुसळधार पाऊस पडत असतानाही हे बचावकार्य सुरू होते. बचाव पथकाने दोन महिन्यांच्या बाळाला व त्याच्या आईला पुराच्या पाण्यातून काढून सुरक्षित स्थळी पोहचवले.

Intro:दोन महिन्यांच्या बाळासह रेस्क्यू टीमने अबाल वृद्धांना पोहचवले सुखरूप स्थळी

अंतोरे येथील 30 ते 40 जण रात्री अडकले होते पुराच्या पाण्यात

कुंडलिका रिव्हर राफ्टिंग टीमने केले रेस्क्यू ऑपरेशन

रायगड : रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आज पेण तालुक्यात 493 मिमी एवढा विक्रमी पडला आहे. त्यामुळे पेण तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले असून पुरमय परिस्थिती रात्रीपासून तालुक्यात निर्माण झाली आहे. पेण मध्ये रात्री मुसळधार पावसाने पुराच्या पाण्यात अंतोरे गावातील 30 ते 40 जण अडकले होते. यामध्ये एक दोन महिन्याचे बाळही आपल्या आई वडीलसोबत अडकले होते. या कुटूंबासह बाळाला रेस्क्यू टीमने सुखरुप रात्री सुरक्षित स्थळी हलविले आहे.Body:जिल्ह्यात पेण मध्ये पावसाने उचांक गाठल्याने पूर्ण तालुका जलमय झाला होता. पेण तालुक्यातील नद्यांही धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अंतोरे गावात पाणी भरण्यास सुरुवात झाली. पाणी हळूहळू ग्रामस्थांच्या घरात घुसू लागल्याने सर्वजण भयभीत झाले. अंतोरे मध्ये पुरमय परिस्थिती आल्याने दोन महिन्याचे बाळ आपल्या पालकासोबत पुराच्या पाण्यात अडकले होते.Conclusion:अंतोरे मध्ये पुराचे पाणी घुसल्याची माहिती मिळताच पेण प्रशासनाने कोलाड येथील महेश पवार यांच्या रेस्क्यू टीमला बोलावले. त्यानंतर महेश पवार यांच्या कुंडलिका रिव्हर राफ्टिंग टीमने बोटीच्या सहाय्याने अंतोरे मधील अडकलेल्या कुटूंबाना हलविण्यास सुरुवात केली. मुसळधार पाऊस पडत असतानाही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. या ऑपरेशन मध्ये रेस्क्यू टीमने दोन महिन्यांच्या बाळाला व त्याच्या आईला पुराच्या पाण्यातून काढून सुखरूप स्थळी पोहचवले.

अंतोरे मधील साधारण 40 ते 50 कुटूंबाना रेस्क्यू टीमने पुराच्या पाण्यातून सुखरूप सुरक्षित स्थळी हलविले. यामध्ये दोन महिन्यांच्या बाळालाही त्याच्या आई सोबत सुखरूप हलविले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.