ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या आरोग्य शिबिराचा २०० कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ - रायगड

हृदयरोग, डायबिटीस, ताण, युरिन टेस्ट, ईसीजी आणि हिमोग्लोबिन याबाबत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधेही देण्यात आली.

रायगड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
author img

By

Published : May 9, 2019, 2:07 PM IST

रायगड - जिल्हा परिषद आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ मे दरम्यान झेडपी कर्मचारी, अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून २०० जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.

रायगड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

अनेकवेळा कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेने माधवबाग यांच्यामार्फत जिल्हा परिषदमध्ये प्रभाकर पाटील सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन ६ ते ८ मे दरम्यान केले होते. यामध्ये हृदयरोग, डायबिटीस, ताण, युरिन टेस्ट, ईसीजी आणि हिमोग्लोबिन याबाबत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधेही देण्यात आली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांच्या नातेवाईक यांनाही या शिबिराचा लाभ घेतला.

माधवबागतर्फे डॉ. अमन कपूर, सचिन कदम तसेच १८ सदस्य यांनी शिबिरात कर्मचाऱ्यांची योग्य तपासणी करुन त्यांच्या आजाराबाबत योग्य उपचार केले. तर, जिल्हा परिषदेनेही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्याबाबत शिबिर घेतल्याबाबत आभार व्यक्त करण्यात आले.

Intro:
रायगड जिल्हा परिषदेतर्फे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

माधवबागतर्फे केली 200 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

रायगड : रायगड जिल्हा परिषद व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचारी, अधिकारी व त्याचे नातेवाईक याच्या आरोग्याबाबत शिबिर 6 ते 8 मे दरम्यान आयोजित केले होते. या शिबिराला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून 200 जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.

रायगड जिल्हा परिषद ही जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था असून याठिकाणी जिल्ह्यातून नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. यावेळी कर्मचारी, अधिकारी त्याच्या समस्या सोडवीत असतात. मात्र काम करताना कर्मचारी, अधिकारी यांना कामाचा ताण असतो. त्यामुळे अनेकवेळा कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो.Body:रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या आरोग्याबाबत काळजी घेऊन जिल्हा परिषदेने माधवबाग याच्या मार्फत जिल्हा परिषदमध्ये प्रभाकर पाटील सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन 6 ते 8 मे दरम्यान केले आहे. यामध्ये हृदयरोग, डायबिटीस, ताण, युरिन टेस्ट, ईसीजी, हिमोग्लोबिन याबाबत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर माधवबागतर्फे मोफत औषधेही देण्यात आली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांच्या नातेवाईक यांनाही या शिबिराचा लाभ देण्यात आला होता. Conclusion:माधवबागतर्फे डॉ. अमन कपूर, सचिन कदम तसेच 18 सदस्य यांनी शिबिरात कर्मचाऱ्यांची योग्य तपासणी करून त्याच्या आजाराबाबत योग्य उपचार करून दिले. तर जिल्हा परिषदेने कर्मचारी व अधिकारी यांच्या आरोग्याबाबत शिबिर घेतल्याबाबत त्याच्याकडून आभार व्यक्त केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.