ETV Bharat / state

रायगड: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाहतूक पोलिसांमुळे जिवदान - woman who tried suicide

पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या समयसुचकतेमुळे या महिलेला वाचवण्यात यश आले आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला
author img

By

Published : Sep 27, 2019, 3:16 AM IST

रायगड - पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या छतावर चढलेल्या महिलेला वाहतूक पोलिसांनी शिताफीने वाचविल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळी माणगाव येथे घडली. विशाल येलवे आणि योगेश मदने असे या वाहतूक पोलिसांचे नाव आहे. दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

माणगाव रेल्वे स्थानकासमोर एका पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एक महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उभी असल्याची माहिती विशाल येलवे यांना फोनद्वारे कळली. यानंतर विशाल येलवे यांनी तातडीने आपले सहकारी योगेश मदने यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी नागरिकांची गर्दी इमारतीच्या खाली जमा झालेली होती. यानंतर विशाल येलवे यांनी महिलेस 'तुम्ही आत्महत्या करू नका, मी तुमची काही अडचण असल्यास मी ती भाऊ म्हणून सोडवतो' असे म्हणत बोलण्यात गुंतवले. दरम्यान, योगेश मदने यांनी इमारतीवर जाऊन महिलेला खेचून खाली आणल्याची माहिती आहे.

हेही वाचा - माझ्याकडील पुराव्यात शरद पवार यांचे नाव नव्हेच - अण्णा हजारे

मिळालेल्या माहिती नुसार, ही महिला माणगाव शहरातील रहिवाशी असून तिचे पती बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन महाविद्यालयात नोकरी करतात. दरम्यान, महिलेचा मागील आठ वर्षांपासून तिचे पती छळ करतात. तसेच तिच्या शरीरात कुठली तरी मशीन देखील बसवलेली आहे. दरम्यान, पतीच्या छळाला कंटाळून ही महिला आत्महत्या करणार होती. मात्र, मुलीच्या भविष्याचा विचार मनात आल्याने हिम्मत झाली नसल्याची माहिती महिलेने दिली आहे. महिलेला सुखरूप वाचविल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तीला माणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आले. यावेळी महिलेचा पती देखील घटनास्थळी पोलिसांसोबत दाखल झालेला होता. दरम्यान, माणगाव पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

हेही वाचा - पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेने साधला 'निशाणा'

Intro:
आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांनी चातुर्याने वाचविले

रायगड : पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यास इमारतीच्या टेरेसवर चढलेल्या महिलेस वाहतूक पोलिसांनी शिताफीने वाचविल्याची घटना आज सायंकाळी माणगाव मध्ये घडली. विशाल येलवे व योगेश मदने या वाहतूक पोलिसांनी एका महिलेचा जीव वाचविला आहे. याबाबत त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.Body:माणगाव रेल्वे स्थानकासमोर एका पाच मजली नव्या इमारतीचे काम सुरू आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेस वर एक महिला आत्महत्या करण्याच्या इराद्याने उभी असल्याची माहिती विशाल येलवे याना फोनद्वारे कळली. विशाल येलवे यांनी तातडीने आपला सहकारी योगेश मदने याला सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी काही नागरिक इमारतीच्या खाली उभे होते. मात्र कोणीही त्यां महिलेस वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. एक महिला टेरेसवर इमारतीच्या कडेला उभी असल्याचे येलवे व मदने यांनी पाहिले.

विशाल येलवे यांनी आत्महत्या करण्यास उभ्या असलेल्या महिलेस तुम्ही आत्महत्या करू नका, मी तुमची काही अडचण असेल तर भाऊ म्हणून मी सोडवतो असे येलवे यांनी त्या महिलेस बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी येलवे यांचे सहकारी मदने यांनी इमारतीवर जाऊन त्या महिलेस खेचून खाली आणले. Conclusion:आत्महत्या करण्यास आलेली महिला ही माणगाव शहरात राहत असून तिचा पती बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन महाविद्यालयात नोकरी करीत आहे. महिलेचा पती आठ वर्षांपासून तिचा छळ करीत आहे. तिच्या शरीरात कुठली तरी मशीन बसवली असल्याचे त्या महिलेने सांगितले आहे. पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणार होती असे त्या महिलेने सांगितले. मात्र मुलीचा चेहरा समोर दिसत असल्याने हिम्मत झाली नाही असे महिलेने सांगीतले असल्याचे येलवे यांनी सांगितले.

महिलेस सुखरूप वाचविल्यानंतर माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी त्या महिलेचे पतीही घटनास्थळी पोलिसांसोबत दाखल झाले होते. माणगाव पोलीस पुढील कारवाई करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.