ETV Bharat / state

सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी; पेणमधील व्यापाऱ्यांची मागणी - रायगड कोरोना बातमी

पेण तालुक्यातील व्यापाऱ्यांना शिथिलता देण्यात यावी, सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन पेण काँग्रेस शहर यांच्यासह एक हिंदुस्तानी इन्सान संस्थेच्या वतीने तहसीलदार आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना दिले.

शिष्टमंळाने अधिकाऱ्यांना निवेदन दिले
शिष्टमंळाने अधिकाऱ्यांना निवेदन दिले
author img

By

Published : Apr 8, 2021, 7:16 PM IST

रायगड - कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता शासनाने ब्रेक दि चेन अंतर्गत घातलेल्या निर्बंधांतून पेण तालुक्यातील व्यापाऱ्यांना शिथिलता देण्यात यावी, सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन पेण काँग्रेस शहर यांच्यासह एक हिंदुस्तानी इन्सान संस्थेच्या वतीने तहसीलदार आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना दिले.

मागील वर्षी केंद्र सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक महिने व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. त्यामुळे आधीच व्यापारी आर्थिक अडचणीत आहेत. अनेक व्यापाऱ्यांची भाड्याची दुकाने आहेत. दुकाने बंद असतानाही दुकानाचे भाडे, लाईट बिल, कामगारांचा पगार तसेच बँकांमधून घेतलेल्या कर्जाचे हप्ते इत्यादी खर्च व्यापाऱ्यांना करावा लागतो. दुकाने बंद असल्यामुळे उत्पन्नाचे साधने पूर्णतः बंद होते. त्यामुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा अधिकच वाढत चालला आहे. व्यापाऱ्यांच्या या समस्यांची प्रशासनाने दखल घ्यावी व त्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस पेण शहर अध्यक्ष प्रवीण शंकर पाटील यांनी केली. या काळात व्यापाऱ्यांकडून शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पूर्णता पालन करण्यात येईल असे आश्वासन अशोक जैन यांनी दिले. तसेच मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सांगितले की, व्यापार्‍यांनी केलेल्या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.