रायगड - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र अलिबाग तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत नाही. अलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी कोरोना मृत्यू संख्या वाढत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने अलिबागमधील वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अलिबाग तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू
पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने वाढली होती. मात्र आता रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र अलिबाग तालुक्यात रोज शंभरहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रुग्ण संख्या बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी सर्वाधिक मृत्यू अलिबाग तालुक्यात झाले आहेत. आतापर्यंत 342 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.