ETV Bharat / state

आज ठरणार गावचा कारभारी,निकालानंतर मिरवणुका काढण्यास बंदी - रायगड मतमोजणीला सुरुवात

रायगड जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरु आहे. प्रत्येक तहसीलदार कार्यलयात अकरा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्ह्यात 612 जागांसाठी 1588 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

निकालानंतर मिरवणुका काढण्यास बंदी
निकालानंतर मिरवणुका काढण्यास बंदी
author img

By

Published : Jan 18, 2021, 11:33 AM IST

Updated : Jan 18, 2021, 12:48 PM IST

रायगड - जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरु आहे. प्रत्येक तहसीलदार कार्यलयात अकरा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्ह्यात 612 जागांसाठी 1588 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. गावचा कारभार कोण करणार याचा फैसला आता होणार आहे. यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी बंदी घातलेली आहे. याठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी राजेश भोस्तेकर यांनी..

आज ठरणार गावचा कारभारी
1588 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार15 जानेवारी रोजी 78 ग्रामपंचायतीच्या 612 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान शांततेत पार पडले असून आज निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 1588 उमेदवार हे रिंगणात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने जिंकण्याचा दावा केला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायत निकाल लागण्याची शक्यता आहे.
निकालानंतर मिरवणुका काढण्यास बंदी
तहसीलदार कार्यालयासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्तनिवडणुकींचे निकाल असल्याने प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर चोख बंदोबस्त पोलिसांनी तैनात ठेवला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी निकालाच्या अनुषंगाने गावागावात पोलीस तैनात ठेवले आहेत. निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. कोण मारणार बाजीजिल्ह्यात महाविकास आघाडी, भाजप अशी लढत होत असली तरी अनेक ठिकाणी प्रत्येक पक्ष हा एकमेकाविरोधात उभा राहिला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुकीत कंबर कसली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोण बाजी मारणार हे काही तासातच कळणार आहे.

हेही वाचा - बर्डफ्लूमुळे माणूस दगावल्याचे दाखवा, पारितोषिक घेऊन जा- पशुसंवर्धन मंत्री केदार

Last Updated : Jan 18, 2021, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.