खालापूर (रायगड) - वयाच्या ८६ व्या वर्षी दारोदारी जाऊन चप्पल शिवण्याची वेळ एका वृद्ध व्यक्तीवर आली आहे. देहू चांगू रोकडे असे या वृद्धाचे नाव आहे. ते मुळ राहणार बदलापूरचे राहणारे असून पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या गावात जाऊन चप्पल शिवण्याचे काम करतात.
हातात काम आणि मुखात विठू माऊलीचे नाव -
देहू हे आपले दैनंदिन काम करत असताना फक्त विठू माऊलीचे नामस्मरण करतात. तसेच वेगवेगळ्या प्रकाराचे अभंग म्हणतात. त्यांना दोन मुले होती. काही वर्ष आधी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर बायकोचेही निधन झाले. त्यामुळे चपला शिवून ते आपला उदर्निवाह करतात. कोणाचे वाईट बगायचे नाही. कोण खाली पडत असेल तर त्याला उचलायचे. कोणाचे चुगलेपणा करायचा नाही, कोणाचीही चाडी करायच नाही, असे ते गावातील तरुणांना सांगतात.
हेही वाचा - 'आम्हाला 2 हजार 280 मतदारांची साथ; गोकुळ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हातात जाईल'