ETV Bharat / state

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; कामोठे कंटेन्मेंट झोन - Commissioner Ganesh Deshmukh

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 138 पैकी 40% कोरोनाचे रूग्ण एकट्या कामोठ्यात आहेत. कोरोनाचा कामोठ्याबाहेर संसर्ग फैलावू नये म्हणून संपूर्ण कामोठे प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण सापडला असेल भागातील इमारत सील करण्यात येत होती. मात्र, आता कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

Corona death
कोरोना मृत्यू
author img

By

Published : May 9, 2020, 8:01 AM IST

रायगड - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी 8 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये कामोठ्यातील दोघांचा तर खांदा कॉलनीमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. आत्तापर्यंत पनवेल महापालिकाहद्दीत 5 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कामोठ्यातील रूग्णांची संख्या पाहता संपूर्ण कामोठे क्षेत्र हे प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३८ झाली असून 41 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कामोठ्यात आज 4 नवीन रूग्ण आढळले असून त्यापैकी 54 वर्षीय महिलेसह 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कामोठे सेक्टर-34, मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील 2 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 54 वर्षीय महिलेला उच्च रक्तदाब व लिव्हर इन्फेक्शनचा त्रास होता. संबधित महिला 4 मे ला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल झाली होती. या महिलेचा आज मृत्यू झाला. या महिलेची सून कामोठ्यातील 'ऑल इज वेल' या क्लिनिकमध्ये कार्यरत असून तिच्यापासून या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

माहिती देताना पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख

कामोठे सेक्टर-11 च्या साईकृपा कॉम्प्लेक्स येथील कोरोनाची लागण झालेली 70 वर्षीय व्यक्ती 5 मे ला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल झाली होती. मधुमेह असलेल्या या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. याशिवाय कामोठे सेक्टर 6 च्या शितलधारा कॉम्प्लेक्स येथील 23 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या कुटुंबातील इतर 3 व्यक्ती याआधी कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाला आहे. खांदा कॉलनी सेक्टर-7 च्या श्रीगणेश बिल्डिंग येथील 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, ही व्यक्ती अदानी एनर्जी कंपनीत कार्यरत होती या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला होता. खारघरमधील तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून, त्यांना कामाच्या ठिकाणी कोरोना झाला असावा, असा अंदाज काढण्यात येत आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 138 पैकी 40% कोरोनाचे रूग्ण एकट्या कामोठ्यात आहेत. कोरोनाचा कामोठ्याबाहेर संसर्ग फैलावू नये म्हणून संपूर्ण कामोठे प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण सापडला असेल भागातील इमारत सील करण्यात येत होती. मात्र, आता कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. कामोठ्यात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.