ETV Bharat / state

ओएनजीसी स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; अग्निशमन यंत्रणा अपुरी असल्याचा आरोप - ऑइल अँड नॅचरल गॅस

रात्री दीडच्या सुमारास गॅस लिकेज झाला होता. मात्र, हा गॅस कोणत्या जागेवरून लीक होतोय हे समजत नव्हते. गॅस लिकेजची जागा शोधता शोधता सकाळ झाली आणि मोठा ब्लास्ट झाला. त्यानंतर ही आग बाजूच्या गावातील नाल्यातून पुढे पुढे सरकत राहिली.

ओएनजीसी स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे
author img

By

Published : Sep 3, 2019, 2:54 PM IST

रायगड - उरण शहराजवळ असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओएनजीसी) गॅस प्लांटमध्ये आज सकाळी या आगीचा भडका उडला. आता ही आग आटोक्यात आणली आहे. लिक्विड लिकेजमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ओएनजीसी स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे

रात्री दीडच्या सुमारास गॅस लिकेज झाला होता. मात्र, हा गॅस कोणत्या जागेवरून लीक होतोय हे समजत नव्हते. गॅस लिकेजची जागा शोधता शोधता सकाळ झाली आणि मोठा ब्लास्ट झाला. त्यानंतर ही आग बाजूच्या गावातील नाल्यातून पुढे पुढे सरकत राहिली. हा सर्व थरार सांगताना येथील नागरिकांच्या डोळ्यात भीतीच चित्र दिसुन आले.

हेही वाचा - उरण ओएनजीसी अग्नितांडव : चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; चार जणांचा मृत्यू

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी सुद्धा आपल्या घरात असणारे पाणी मारून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, स्थानिक नागरिकांनी सुरू केलेले प्रयत्न अपुरे पडत होते. अखेर बराच वेळ ही आग धुमसत राहिली आणि ओएनजीसी कंपनीच्या गेटसमोर नागरिक येऊन विचारू लागले. मात्र, नागरिकांना कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी कसलीही माहिती न देता टाळाटाळ केली. त्यानंतर काही तासानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या पाहताच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आणि लोक सैरावरा पळू लागले.

हेही वाचा -गरज पडली की पवार साहेबांचा सल्ला अन् नंतर...

ओएनजीसी सारखे मोठे मोठे प्रकल्प असलेल्या या परिसरात आगीच्या घटना या नेहमीच्याच झालेल्या आहेत. परंतु, तरीही येथे अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.

Intro:रायगड जिल्ह्यातल्या उरण शहराजवळ ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) चं गॅस प्लांट आहे. आज सकाळी या प्लांटमध्ये आगीचा भडका उडला. आता ही आग आटोक्यात आणली आहे. लिक्विड लिकेजमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्री दीडच्या सुमारास सुरवातिला गॅस लिकेज झाला होता. मात्र हा गॅस कोणत्या जागेवरून लीक होतोय हे समजत नव्हतं. गॅस लिकेजची जागा शोधता शोधता सकाळ झाली आणि मोठा ब्लास्ट झाला. त्यानंतर ही आग बाजूच्या गावातील नाल्यातून पुढे पुढे सरकत राहिली, हा सर्व थरार सांगताना इथल्या नागरिकांच्या डोळ्यात भीतीच चित्र दिसुन आलं.Body:त्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी सुद्धा आपल्या घरात असणारे पाणी मारून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, स्थानिक नागरिकांनी सुरू केलेले प्रयत्न अपुरे पडत होते. अखेर कितीतरी तास ही आग धुमसत राहिली आणि ओएनजीसी कंपनीच्या गेटसमोर नागरिक येऊन विचारू लागले. मात्र तेव्हाही नागरिकांना कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी कसलीही माहिती न देता टाळाटाळ केली. त्यानंतर किती तरी तासानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या पाहताच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आणि सैरावरा पळू लागले. Conclusion:ओनजीसी सारख्या मोठे मोठे प्रकल्प असलेल्या या परिसरात आगीच्या घटना या नेहमीच्याच झालेल्या आहेत. परंतु तरीही इथे अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.