रायगड - आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून जिल्ह्यात ३८ हजार १४ विद्यार्थी ६९ केंद्रांवर परीक्षा देत आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष भरारी पथकासह ७ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तर प्रत्येक केंद्रात एका केंद्राध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दहावीची परीक्षा मुलांचे करिअर घडण्याची पहिली पायरी असते. त्यामुळे या परीक्षेत उत्तम गुण भेटल्यास विद्यार्थी हा आपली आवडती शाखा निवडून पुढील वाटचाल करत असतो. यामुळे पालक वर्गही आपल्या मुलाने या परीक्षेत चांगले गूण मिळवावे, यासाठी प्रयत्नशील असतात.
आज परीक्षा केंद्राबाहेर आपल्या पाल्याला वर्गात सोडण्यासाठी प्रत्येक केंद्राबाहेर गर्दी झालेली होती. शिक्षण विभागाकडूनही दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आलेली आहे. परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्यांवर शिक्षण विभागाची करडी नजर असून यासाठी भरारी पथक नेमण्यात आलेली आहेत.