रायगड - जिल्ह्यात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दरोडा करून फरार आरोपींना 15 वर्षांनंतर पकडण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. विभीषण शिंदे, विभीषण काळे, सुरेश दीक्षित (सर्व रा. कळंब, जि. उस्मानाबाद) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तीनही आरोपींना 15 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील विभीषण काळे यांची पत्नी ही गावची सरपंच तर मुलगी पोलीस खात्यात नोकरी करीत आहे. आरोपी हे ट्रकद्वारे माल जिल्ह्यात आणायचे व परतताना घरफोडी करून फरार व्हायचे, अशाप्रकारे ते आपला गोरखधंदा चालवायचे.
हेही वाचा - पाकिस्तानकडून तब्बल २ हजार २२५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लघंन
25 जानेवारी 2004 व 19 जानेवारी 2005 रोजी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दरोड्याचा गुन्हा घडला होता. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात विभीषण शिंदे, विभीषण काळे, सुरेश दीक्षित यांच्या विरोधात घरफोडी, दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी हे फरार होते. तेव्हापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते.
हेही वाचा - दुष्काळ सुरुच; चारा छावण्या १ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार, पशुधन वाचवण्यासाठी सरकारचा निर्णय
त्यांची नावे रायगड जिल्हा पोलीस राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आरोपी यांचा शोध घेणेकरिता वेळोवेळी त्यांचे राहते गावी उस्मानाबाद येथे पोलीस पथके पाठविण्यात येत होती. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. गुप्त खबऱ्याकडून घरफोडी, दरोड्यातील आरोपी गावी आल्याची माहिती खोपोली पोलिसांना लागली होती. त्यानुसार खोपोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल वळसंग यांनी पोलीस शिपाई प्रवीण भालेराव व प्रदीप खरात यांच्या पथकाने कळंब, उस्मानाबाद येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा - पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक
आरोपींना खोपोली येथे आणल्यावर त्यांना पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. तर आरोपी यांचेविरुद्ध महाराष्ट्र व परराज्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, डॉ. रणजीत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विभाग, डी.बी.क्षीरसागर पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल वळसंग पोलीस उप निरीक्षक, सहकारी पोशि प्रवीण भालेराव, प्रदीप खरात यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - चंद्रशेखर बावनकुळेंची ऊर्जा कुणी अन् का काढून घेतली?
विभीषण शिंदे, विभीषण काळे, सुरेश दीक्षित हे आरोपी रायगड जिल्ह्यात ट्रकमध्ये माल घेऊन येत होते. त्यानंतर ते घरफोडी करून फरार होत होते. तीनही आरोपी हे पारधी समाजाचे आहेत. घरची परिस्थिती चांगली असूनही हे आरोपी गुन्हे करीत होते. या आरोपींपैकी विभीषण काळे याची पत्नी सरपंच असून मुलगी पोलीस खात्यात रुजू आहे.