ETV Bharat / state

जलक्रीडा व्यवसायाला एमएमबीकडून परवानगी नाहीच, व्यवसायिकांचा अधिकाऱ्यांना घेराव - Raigad latest news

टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर पर्यटनालाही शासनाने परवानगी दिली. समुद्र पर्यटन पुन्हा जोमाने सुरू झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एमएमबीकडून परवानगी मिळत नसल्याने जलक्रीडा व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. परवानगी देण्याची मागणी व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

water sports business news
व्यवसायिकांचा एमएमबी अधिकाऱ्यांना घेराव
author img

By

Published : Dec 11, 2020, 6:28 PM IST

रायगड - टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर पर्यटनालाही शासनाने परवानगी दिली. समुद्र पर्यटन पुन्हा जोमाने सुरू झाले. मात्र जलक्रीडा व्यवसायिक एमएमबीच्या कागदोपत्री परवानगीच्या कात्रीत अडकले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एमएमबीकडून परवानगी मिळत नसल्याने जलक्रीडा व्यवसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यवसायिकांनी अलिबाग एमएमबी अधिकाऱ्यांना घेराव घालून, व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागितली.

10 महिन्यापासून जलक्रीडा व्यवसाय बंद

मार्च महिन्यापासून कोरोना महामारी सुरू झाली आणि शासनाने समुद्रकिनारे पर्यटनास बंद केले. त्याचा मोठा फटका हा जलक्रीडा व्यवसायिकांना बसला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू शासनाने व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. यामध्ये समुद्र पर्यटनही खुले केले. शासनाने पर्यटनास परवानगी दिल्याने, आठ महिने व्यवसाय बंद असलेल्या घोडागाडी, उंट सफारी, एटीव्ही तसेच जलक्रीडा व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र अद्यापही जलक्रीडा व्यवसायिकांना एमएमबीने परवानगी दिली नसल्याने हे व्यवसायिक अडचणीत आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मात्र एमएमबीचा नकार

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी समुद्रातील जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर जलक्रीडा व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले. मात्र एमएमबी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने पुन्हा व्यवसाय बंद पडला.

व्यवसायिकांचा एमएमबी अधिकाऱ्यांना घेराव

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जलक्रीडा सुरू, रायगडात मात्र बंदी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणच्या समुद्रकिनारी जलक्रीडा व्यवसाय सुरू आहे. रोरो, प्रवासी जलवाहतूक यांनाही परवानगी आहे. पर्यटकही रोज येत आहेत. मग आम्हालाच बंदी का असा प्रश्न रायगडमधील जलक्रीडा व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. दहा महिने व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. कर्मचाऱ्यांचे पगार, बोटींचा खर्च, बँकेचे हफ्ते भरायचे कसे असा सवाल व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.