रायगड - खोपोली येथील क्रांतीनगर भागात राहणारे बहीण-भाऊ बेपत्ता झाले होते. हे बहीण-भाऊ शास्त्रीनगर - विणानगर भागातून वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांडून सांगण्यात आले होते. आज (20 जुलै) शोध मोहिमेदरम्यान दुपारच्या सुमारास निलम हचंलीकर हिचा मृतदेह साजगाव येथील नदिपात्रात सापडला आहे, मात्र तिचा भाऊ अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - खापोलीचे भाजपा नेते मंगेश काळोखे यांचा 500 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
निलम श्रीकांत हचंलीकर (वय 7), बाबू श्रीकांत हचंलीकर (वय 5) असे बहीण-भावाचे नाव आहे. शास्त्रीनगर - विणानगर भागातून वाहणाऱ्या नाल्याला लागून असलेल्या क्रांतीनगर भागातील बहीण-भाऊ पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडले असता ते उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते हे दोघे जण नाल्याच्या पाणी प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात आले होते.
19 जुलैला रात्री उशिरा पर्यंत दोघेही भाऊ-बहीण सापडले नाहीत. 20 जुलैला खोपोली पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या पथकाला शोध मोहिमेदरम्यान दुपारच्या सुमारास साजगाव येथील नदिपात्रात निलम हचंलीकर हिचा मृतदेह सापडला. मात्र, बाबू श्रीकांत हचंलीकर याचा मृतदेह सापडून आला नाही. पथकाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा - रायगडमध्ये पावसाचा लपंडाव, प्रशासन सतर्क