रायगड - तळा तालुक्यातील कळमशेत येथे फार्महाऊसवर शुक्रवारी (13 ऑगस्ट) झालेल्या गोहत्येचा (cow slaughter) निषेध ( protest) करण्यात आला. यासाठी तळा बाजारपेठ (Tala Taluka Market) दुपारी 2 वाजल्यानंतर बंद करण्यात आली. यावेळी तळावासीयांतर्फे आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. तसे निवेदनही तळा पोलीस ठाणे येथे देण्यात आले. तळा शहरातील सर्व नागरिक व व्यापारी तसेच सर्वपक्षीय नेते यांची शहरातील मंगलकार्यालयात सकाळी १० वाजता संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गोहत्येचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी तळा बाजारपेठ दुपारी 2 वाजल्यापासून पूर्णतः बंद ठेवण्याचे ठरवण्यात आले.
कारवाईसाठी एकजुटीने बाजारपेठ बंद
गोहत्या प्रतिबंध कायदा (Cow Slaughter Prevention Act) तयार होऊनही गोहत्या होतच आहेत. जिल्ह्यात चोरीच्यामार्गाने गोहत्या करण्यात येत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यासाठी रात्रीच्या काळोख्यात गुरांना पळवून नेण्यात आल्याच्या घटनाही अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, असे असतानाही बेकायदेशीररित्या गोहत्या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये केल्या जात आहेत. अशाप्रकारे कमळशेत येथील एका फार्महाऊसवर (On Farm House) करण्यात आलेल्या गोहत्येप्रकारणी नागरिक, व्यापारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी या प्रकाराचा निषेध नोंदवून तळा बाजारपेठ (Market) बंद ठेवण्यात आली होती.
कारवाईसाठी डीवायएसपीकडे निवेदन
दुपारी 2 वाजता व्यापाऱ्यांनी तळा बाजारपेठ उस्फुर्तपणे बंद केली. एकजुटीने तळा पोलीस ठाणे येथे जाऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी डीवायएसपी प्रवीण पाटील (DYSP Praveen Patil) यांना निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यपालांनी राजकारणातलं प्यादं बनू नये - संजय राऊत