ETV Bharat / state

रायगडमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरेंची राष्ट्रवादीत घरवापसी

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत पुन्हा राष्ट्रवादीमधे घरवापसी केली आहे.

रायगडमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरेंची राष्ट्रवादीत घरवापसी
author img

By

Published : Oct 9, 2019, 9:42 PM IST

रायगड - राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत पुन्हा राष्ट्रवादीमधे प्रवेश केला. त्यामुळे अनेक कारणाने बॅकफुटवर असणारे आघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाड फ्रंटफुटवर आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा- नोबेल २०१९ : जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो ठरले रसायनशास्त्रातील नोबेलचे पारितोषिक विजेते!

शिवसेना जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे यांनी केलेला राष्ट्रवादी प्रवेश, नाराज जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर प्रचारात सक्रिय आणि आज माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांची घरवापसी ही तीन प्रमुख कारणे त्यामागे असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड शिवसेनेत जाऊन विधानसभा लढवणार अशा चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर कर्जतमधे ऐकायला मिळत होत्या. त्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारली असल्याने कर्जत मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात होते. खासदार सुनिल तटकरे यांनी मनधरनी करीत सुरेश लाड यांना निवडणूक लढवण्यास तयार केले. मात्र, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांचा सुरेश लाड यांना विरोध असल्याचे समोर आले होते. मसूरकर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, अशा बातम्या माध्यमात येत होत्या. त्यामुळे पुन्हा कर्जतची उमेदवारी घेतलेले विद्यमान आमदार यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

हेही वाचा- ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन

शिवसेनेचे नाराज जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमधे प्रवेश केला. सुरेश लाड यांना निवडून आणणारच, असा विडा उचलित त्यांनी काम सुरू केले. उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन हात लांब असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मसूरकर काल लाड यांच्या बाजूने प्रचारात उतरले. आज शिवसेनेत गेलेले रायगड जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी घरवापसी करीत राष्ट्रवादीमधे प्रवेश केल्याने सुरेश लाड यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत आमदारकीचे तिकीट महेंद्र थोरवे यांना मिळाल्याने नाराज झालेले जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते अनेक कारणाने बॅकफुटला पडलेले उमेदवार आमदार सुरेश लाड यांच्याकडे एक ताकद निर्माण झाली आहे. मात्र, काल जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या सक्रिय होण्याने सुरेश लाड हे कर्जतमधे पुन्हा त्याच जोमाने फ्रंटफुट वर आल्याचे बोलले जात असून ही लढत मोठी चुराशिची होणार हे नक्की.

Intro:राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत डेरेदाखल झालेले माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज शिवसेनेला जयमहाराष्ट्र करीत पुन्हा राष्ट्रवादी मधे केल्याने अनेक कारणाने बैकफुट वर असणारे आघाडीचे उमेदवार आमदार सुरेशभाऊ लाड फ्रंटफुट वर आल्याचे बोलले जात आहे. शिवसेना जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे यांनी केलेला राष्ट्रवादी प्रवेश, नाराज जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर प्रचारात सक्रिय व आज माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांची घरवापसी ही तीन प्रमुख कारणे त्यामागे असल्याचे बोलले जात आहे.Body:रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदार संघाचे राष्ट्रवादी चे विद्यमान आमदार सुरेशभाऊ लाड हे शिवसेनेत जाऊन विधानसभा लढ़वनार अश्या चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर कर्जत मधे ऐकायला मिळत होत्या व त्या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी कडून उमेदवारी ही नाकारली असल्याने कर्जत मधील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते संभ्रमात होते, खासदार सुनिल तटकरे यांनी मनधरनी करीत सुरेशभाऊ लाड यांना निवडणूक लढवन्यास तैयार केले खरे पण राष्ट्रवादी चे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांचा सुरेशभाऊ लाड यांना विरोध असल्याचे समोर आले होते व मसूरकर ही राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देणार अश्या बातम्या माध्यमात येत होत्या त्यामुळे पुन्हा कर्जत ची उमेदवारी घेतलेले विद्यमान आमदार यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते पण शिवसेनेचे नाराज जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्तितित राष्ट्रवादी मधे प्रवेश केला व सुरेशभाऊ लाड यांना निवडून आणनारच असा विडा त्यांनी उचलित काम सुरु केले, उमेदवारी जाहिर झाल्यापासुन दोन हात लांब असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मसूरकर ही काल लाड यांच्या बाजूने प्रचारात उतरले व आज शिवसेनेत गेलेले रायगड जिल्हापरिषद चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी घरवापसी करीत राष्ट्रवादी मधे प्रवेश केल्याने सुरेशभाऊ लाड यांचे पारडे जड़ झाल्याचे बोलले जात आहे. Conclusion:शिवसेनेत आमदारकीचे तिकीट महेंद्र थोरवे यांना मिळाल्याने नाराज झालेले जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय विश्लेशकांच्या मते अनेक कारणाने बैकफुट ला पडलेले उमेदवार आमदार सुरेशभाऊ लाड यांच्याकडे एक ताकद निर्माण झालीच पण काल जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या सक्रिय होण्याने सुरेशभाऊ लाड हे कर्जत मधे पुन्हा त्याच जोमाने फ्रंटफुट वर आल्याचे बोलले जात असून ही लढत मोठी चुराशिची होणार हे नक्की
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.