रायगड - कोरोनामुळे शाळा महाविद्यालय सुट्टी जाहीर झाल्याने पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शिक्षण विभागाने रद्द केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत अजून शासनाने निर्णय घेतलेला नाही. मात्र, राज्य शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांनी रोज नवीन विषयाची अभ्यासाची लिंक तायार करून स्कुल फ्रॉम होम ही दिशा अॅपद्वारे तयार केलेली अभ्यास माला संकल्पना राबवली आहे.
या अॅपमुळे शाळा बंद असल्यातरी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी घरी बसून आपला अभ्यास पूर्ण करत आहेत. या संकल्पनेला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राजीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी दिली.